✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील राममंदिर वॉर्ड येथील राम मंदिराजवळ माजी नगरसेवक विनोद झाडे यांच्या वतीने दरवर्षी लावण्यात येणाऱ्या पाणी प्याऊ च्या उदघाटन कार्यक्रम आज मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी दि 22 मार्चला लोकार्पण करण्यात आले.
या पाणी प्याऊचे उदघाटन कवी शांतीलालजी कोचर, राम मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष संजय बोथरा, डॉ. रमेश करवा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश राऊत, सोनू गवळी, गोविंद पुरोहित, गुड्डू शर्मा, किरीट शेजपाल, आशिष पर्बत, प्रदीप जोशी, धर्मा धात्रक, श्रीकांत करवा, बालू वानखेडे, लीलाधर मडावी, पंकज देशपांडे, गिरीष वकील, सचिन नेवारे, अश्विन ढाले, पप्पू आष्टीकर उपस्थती होते. यावेळी विशाल गुगलानी यांच्या कडून अल्पोहरचा वाटप करण्यात आला. भर रणरणत्या वैशाख वणव्यात जनतेची तृष्णा भागविणाऱ्या या विनोद झाडे यांच्या उपक्रमाची सर्वांनी प्रशंसा केली.