उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जमखंडी:- जमखंडी येथील एस सी एस टी समन्वय समितीच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव असा संयुक्त समारंभ रविवार दि.१९ मार्च २३ रोजी मुरगोड कल्याण मंटप मॕरेज हाॕल येथे आयोजित करण्यात आला होता.
या समारंभाचे प्रमुख वक्ते लिंगायत समाजाचे ज्ञानप्रकाश स्वामीजी (म्हैसूर), सिध्द राजु (IPS) बेंगलोर, हे होते. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून उद्योगपती सी.आर. सांगलीकर हे होते. तर बसवनंदा स्वामीजी (जमखंडी) आयु.मणिकट्टी हे प्रमुख पाहुणे होते. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून उद्योगपती सी.आर. सांगलीकर साहेबांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध,बसवेश्वर महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजनाने आणि रोपाला (वृक्षाला) सर्व पाहुण्यांच्या हस्ते पाणी घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने सुरूवात केली.
यावेळी आयु.सिध्दराजु (IPS) यांनी भारतीय संविधान आणि राज्याधिकार या विषयावर साध्या सोप्या भाषेत आपले सुंदर विचार मांडले.दुसरे वक्ते ज्ञानप्रकाश स्वामीजींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती दिली.आज समाजामध्ये वाढत चाललेल्या अंधश्रद्धा विषयावर परखडपणे मत मांडले.शेवटी अध्यक्षीय भाषण उद्योगपती माननीय सांगलीकर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलिप दोडमणी यांनी केले.स्वागत हिरगेश शिंगे सर यांनी केले तर प्रास्ताविक सुरेश भोसले यांनी केले. या समारंभास बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील दिड ते दोन हजार लोक उपस्थित होते.यावेळी उपस्थितांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन कर्नाटक राज्य एस.सी.एस.टी. समन्वय समितीचे अध्यक्ष प्रशांत जमगे, उपाध्यक्ष एच.बी.शिंगे, सचिव दशरथ मादर , जिल्हा सेक्रेटरी सुरेश भोसले,दिलीप दोडमणी यांनी केले होते.