नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ / चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी यवतमाळ येथील प्रसिध्द डॉक्टर दाम्पत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गुढीपाडवा असल्यामुळे सुट्टी होती त्यामुळे यवतमाळ येथील डॉक्टर दाम्पत्य आपल्या मुलाला भेटण्यासाठी नागपुर येथे जात होते. त्यावेळी डॉक्टर दाम्पत्यावर काळाने झडप घातली. भरधाव हायवा ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मारेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल यांचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात नव्या वरोरा-वणी मार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला. मारेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल अशी मृतांची नाव आहे.
अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल हे दाम्पत्य लहानगा मुलगा मारेगाव इथं ठेऊन कामानिमित्त नागपुरात गेले होते. परत येताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. नव्या महामार्गावर कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवाने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. घटनास्थळी डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल यांचा मृत्यू झाला.
महामार्गावरच्या शेंबळ गावाजवळ अपघात झाल्यावर स्थानिकांनी दोघांना वरोरा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोवर उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.