राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील तोहगाव येथे चौकात असलेली शिवमंदिर जीर्णावस्थेत आहे. हिंदूनववर्षाचा औचित्य साधून नविन मंदिर बांधकामासाठी गूढीपाडवाचा शुभमुहूर्तावर भूमीपूजन सोहळा माजी जि.प.सदस्य श्री अमर बोडलावार व सौ वैष्णवीताई अमर बोडलावार यांचा हस्ते संपन्न करण्यात आला.
यावेळी तिथे भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश उत्तरवार, अतुल कासनगोट्टीवार श्री बोंडे, संदिप बूक्कावार, किशोर कासनगोट्टूवार, अतूल बूक्कावार, अनंतूलवार, अभिनव उत्तरवार, यश उत्तरवार, प्रतिक कासनगोट्टूवार, रमेश पाटील मोरेजी, सुरेश पाटील मोरे, मनोहर पाटील मोरे गावातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.