आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- आदिवासी बिरसा मुंडा अधिकार व शिक्षा समिती वर्धा जिल्ह्याच्या वतीने दिनांक 15 ऑगस्ट 2022 ला सकाळी 08.30 वाजता श्री पंजाबराव सिराम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच 09.00 वाजता सत्कार समारंभ संपन्न झाला, यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये हा 75 वा स्वातंत्र्य आजादी अमृत महोत्सव , बिरसा मुंडा नगर, जुनापाणी चौक, पिंपरी (मेगे) वर्धा येथे मोठ्या उत्साहाने पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंजाबराव श्रीराम (सेवानिवृत्त इंजिनिअर एम. एस. ई. बी) व श्री. जामुवनतराव मडावी (कृषी मंडळ अधिकारी वर्धा तालुका), श्री मनोहरराव नाईक (अध्यक्ष बहुजन समाज आघाडी व आजचे सत्कार मूर्ती श्री. अर्जुनराव जुगनाके, श्री. नर्गस कुंबरे, श्री. देविदास श्रीरामे (सेवानिवृत्त सहकारि बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले श्री. नागोराव धुर्वे (संस्था उपाध्यक्ष) श्री सुखदेवराव उइके (संस्था सचिव) श्री. अशोकराव कुंभरे (संस्था सदस्य) श्री. अंकुशराव धुर्वे (संस्था सदस्य) तसेच मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन श्री अशोक कुंबरे यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार संस्थापक सचिव सुखदेवराव उइके यांनी मानले. यानंतर गावकरी मंडळी व लहान विध्यार्थाच्या उपस्थितीमध्ये 15 ऑगस्ट आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने बिरसा मुंडा नगर, जुनापाणी चौक, पिंपरी (मेघे) वर्धा येते संपन्न झाला. यानंतर लहान मुला मुलींची 5:30 च्या सुमारास परेड द्वारे ध्वजारोहण उतरण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.