महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- तालुक्यातील आश्वि बुद्रुक येतील रहिवासी सध्या पुणे येथे कामा निम्मित वास्तव्यत असलेले प्रतीक राजेंद्र रतडिया यांची अमेरिकेतील नासा या संस्थेत संशोधक म्हणून निवड झाली आहे.
या बाबत अधिक मिळालेली माहिती अशी की अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेले नॅशनल आरोनॅटिक्स स्पेस ऍडमिनरेशन मध्ये संशोधक म्हणून नुकतीच प्रतीक रताडिया यांची निवड झाल्याची माहिती मिळाल्याने सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया नातेवाईक मित्रपरिवार व ग्रामस्थांनी दिली.
प्रतीक रताडिया पुढील महिन्यासाठी कृत्रिम बुद्धिमातेचा वापर करून नासाच्या मंगल ग्रहवर गेलेल्या यांनामध्ये वि्संगाती शोधण्याच्या पद्धती विकसित करणार आहे या प्रकल्पासाठी प्रतीक ची अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्या मध्ये नासाच्या जेट प्रोपोशनल लॅब मध्ये विद्यार्थी संशोधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.