Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पुणे जिल्हात पोस्ट मास्तरांने लाखोची हेराफेरी करून केली फसवणूक, 6 लोकांवर गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 26, 2023
in Uncategorized, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे जिल्हात पोस्ट मास्तरांने लाखोची हेराफेरी करून केली फसवणूक, 6 लोकांवर गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक फसवणुकीची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील टपाल कार्यालयामध्ये आलेल्या गुंतवणुकदारांनी केलेली गुंतवणुक ही शाखा कार्यालयात केलेली आहे, असे दर्शवून त्यावर परस्पर कमिशन घेऊन तब्बल 23 लाख 76 हजार 215 रुपयांची पोस्ट खात्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोस्टमास्तरांनी इतरांना हाताशी धरुन ही हेराफेरी केली आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. योगेश् नानासाहेब वीर वय 42 वर्ष रा. खडकमाळ आळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी उपडाकघरचे पोस्ट मास्तर ज्योतीराम फुलचंद माळी वय 40 वर्ष, रा. येवलेवाडी, लिपीक भगवान श्रीरंग नाईक वय 36 वर्ष, रा. दिघी, धानोरी पोस्ट मास्तर गणेश तानाजी लांडे वय 37 वर्ष, रा. धानोरी, धानोरी पोस्ट मास्तर मधुकर गंगाधर सूर्यवंशी वय 49 वर्ष,रा. भैरवनगर, धानोरी, रमेश गुलाब भोसले रा. वानवडी, विलास एस देठे वय 59 वर्ष,रा. वानवडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट खात्याच्या नियमानुसार डाकघरात ग्राहक थेट गुंतवणुक करायला आले तर त्यावर पोस्टमास्तरला कमिशन मिळत नाही. मात्र, त्या डाकघराच्या अंतर्गत इतर डाकघर असतील तेथे गुंतवणुक करण्यात आली असेल तर त्यावर तेथील पोस्ट मास्तरांना कमिशन मिळते. त्यामुळे दिघी डाक कार्यालयात आलेल्या गुंतवणुक अन्य डाकघरातून आल्या असल्याचे दाखवून त्याचे कमिशन लाटल्याचे टपाल खात्याच्या वार्षिक तपासणीत उघडकीस आले आहे.

हा प्रकार दिघी टपाल कार्यालयात 16 जुलै 2018 ते 21 ऑगस्ट 2020 दरम्यान दिघी कार्यालयात 274 गुंतवणुकदारांनी 9 कोटी 62 लाख 98 हजार रुपयांची गुंतवणूक पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये केली होती. त्यांना धानोरी शाखा डाकघर येथे खाते उघडण्यास लावल्याचे दाखविले. त्या रक्कमेपोटी 18 लाख 35 हजार 115 रुपये धानोरी डाकघरास दिले. ती रक्कम आपसात वाटून घेतली. पोस्ट खात्याची खातेदारांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बनावट सह्या करुन पोस्टाची फसवणूक केली. त्याप्रमाणे डंकर्क लाईनमध्ये आलेल्या 59 गुंतवणुकदारांची एकूण 2 कोटी 47 लाख 60 हजार रुपये रक्कम स्वीकारुन त्यांचे बीआरडी डाकघरामध्ये टीडी खाते उघडण्यास लावून त्यांच्या कमिशनपोटी 4लाख 95 हजार 200 रुपये स्वीकारले. त्यातील 75 टक्के रक्कम ज्योतीराम माळी याने घेऊन 25 टक्के रक्कम बीआरडी शाखा डाकपाल रमेश भोसले यांना दिली.

विमाननगर येथील उपडाकघरात विलास देठे हा उपडाकपाल म्हणून कार्यरत असताना त्याने आवर्ती ठेव खाते आणि सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खातेदारांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आलेल्यांच्या रक्कम स्वीकारुन त्यांच्या पासबुकवर नोंद करुन त्याची शासकीय फिनाकॅल प्रणाली मध्ये नोंद करायची जबाबदार देठे यांच्यावर होती. त्याने 19 खातेदारांनी आवर्ती ठेव खाते व सुकन्या समृद्धी योजना या योजनेअंतर्गत खात्यांमध्ये विविध तारखांना जमा केलेली 45 हजार 900 रुपयांची रक्कम सरकारी हिशोबामध्ये जमा न करता फसवणूक केली.

Previous Post

बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे नगर परिषद चौक मध्ये राहुल गांधी यांच्या खासदार पद रद्द निषेधार्थ सभा संपन्न.

Next Post

संगमनेर तालुक्यातील आश्विचा सुपुत्र करणार अमेरिकेतील ‘नासा’ मध्ये संशोधन!

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संगमनेर तालुक्यातील आश्विचा सुपुत्र करणार अमेरिकेतील ‘नासा’ मध्ये संशोधन!

संगमनेर तालुक्यातील आश्विचा सुपुत्र करणार अमेरिकेतील 'नासा' मध्ये संशोधन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In