पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- मा. पोलीस आयुक्त सो, यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने दिनांक २४/०३ /२०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे अधिपत्याखाली सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंदयांची माहीती काढण्याकरीता, तळेगाव दाभाडे भागात पेट्रोलिंग करीत असतांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राखाडी रंगाची इको गाड़ी नंबर MH- 14/EY/3668 ही गाडी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे रात्री उशीरा येणार असुन, त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा सदृश्य पदार्थाचा साठा विक्री करीता आणणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, सपोनि उध्दव खाडे यांनी सोबत असलेल्या स्टाफला ब्रीफ करुन, कडोलकर कॉलनी येथील लायन्स क्लब जवळ सापळा लावुन, दिनांक २५/०३/२०२३ रोजी ०५/३० बाचे सुमारास इको कार ने MH-14/EY/3668 मधुन निहार गोपाल विश्वास वय ५१ वर्षे रा. म्हस्करनेस कॉलनी, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि.पुणे असे सांगुन त्याचे सोबत असलेला इसम हा त्याचा कामगार असून, त्याचे नाव अविजीत रणजीत बाच्छार वय २६ वर्षे रा. सदर यांना शिताफिने ताब्यात घेवुन इको कारची पाहणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक अपायकारक असा २.९४.५५४/- रुपये किंमतीचा गुटखा मिळून आल्याने, इको कार, ०२ मोबाईल व २,९४,५५४/- रुचा गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण ७,५४,५५४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचेविरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुरनं. १३६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८.३४ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम ३० ( २ ) ( ९ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.