मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेउन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे निवेदना द्वारे केली मागणी.
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावी अशी नागरिकांची होत आहे मागणी. वर्धा जिल्हयात होणारे वैद्यकीय महाविद्यालय (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) हे हिंगणघाट शहरात करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेउन चर्चा केली व निवेदना द्वारे मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात १४ जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये वर्धा जिल्हात वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. तरी वर्धा जिल्हात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे जनतेच्या सुविधेच्या दृष्टीकोणातुन हिंगणघाट शहरात व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.
वर्धा जिल्हयात सेवाग्राम व सावंगी येथै दोन वैद्यकीय महाविद्यालय आहेत. हिंगणघाट शहराची लोकवस्ती सव्वा लाखाच्या वर असुन पोहणा, वडनेर, शेकापुर (बाई), कानगांव, अल्लीपुर, सावली (वाघ), वाघोली सर्कलचा ग्रामीण भाग जवळजवळ तालुक्यातील १६६ गावांनी जोडला गेला आहे. समुद्रपुर तालुक्यातील १३८ गावे हिंगणघाट शहराला लागुन आहे. सेलु तालुक्यातील सिंदी (रेल्वे), हमदापुर सर्कलचा ग्रामीन भाग जवळ आहे.
चंद्रपुर जिल्हातील वरोरा तालुका, चिमुर तालुका, हिंगणघाट शहराला लागुन आहे. नागपुर जिल्हयातील उमरेड तहसीलचा संपुर्ण भाग हिंगणघाट शहराला लागुन आहे. यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा तहसील, वणी तहसीलचा संपुर्ण परिसर हिंगणघाट शहराला लागुन आहे. हिंगणघाट शहरातून नॅशनल हायवे नं.44 नागपुर ते हैदराबाद रोड जात आहे. वर्धा ते बल्लारशहा रेल्वे मार्ग हिंगणघाट शहरातुन जात आहे. चंद्रपुर ते नागपुर हायवे हा जाम चौरस्ता असुन हिंगणघाट शहराला लागुन आहे. भौगोलीक दृष्टयासर्वांगीण विचार केला असता हिंगणघाट शहराला लगत आंध्र प्रदेशचा भाग आहे.शहराला लागुन या मार्गावरून खुप मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
या सर्व बाबींचा विचार केला असता नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी हिंगणघाट शहरात वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे.या सर्व बाबी मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आणुन दिल्या.
तरी महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या वैद्यकीय सेवेच्या दृष्टीकोणातुन वर्धा जिल्हयात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची मुंबई येथे भेट घेउन निवेदना द्वारे मागणी केली आहे.