पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
परिमंडळ ५ शोध पथक पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी वेळोवेळी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे अभिलेखावर पाहिजे फरारी असलेले आरोपीची संख्या जास्त असून त्यांचा शोध घेवून त्यांचेवर अटकेची कारवाई होणेबाबत विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशित केलेले होते त्यानुसार पोलीस उपआयुक्त, परिमंडखील पोलीस स्टेशनकडील वरील कामगिरी करणारे निवडकच माहीतगार अमलदार यांचे नेमणूक करुन परिमंडलीय यांचे पाहिजे फरारी असलेले आरोपीचे शोध पथक तयार करणेत आलेले आहे. परिमंडलीय ५ चे पाहिजे व फरारी पथकातील अंमलदार सर्फराज देशमुख व नासीर देशमुख यांना संयुक्तिकरित्या मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की वानवडी पोलीस स्टेशन मु. रजि. नं. १९५/२०२१ भादवि क. १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट क. ४ (२५) सह ३७ (१) (३) क्रिमिनल अॅक्ट क. ७ मधील पाहिजे आरोपी नाम मारी रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे असा अपूर्ण नाव पत्ता असल्याने तो पोलीसांना गेल्या दोन ते अडीच वर्षा पासून गुंगारा देत होता परंतु परीमंडळ ५ पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून त्यास साच्यात घेतला व त्याने आपले पुर्ण नाव मारी ऊर्फ तोहीद रफीक तांबोळी य १९ वर्ष, रा. गल्ली नं.१२. शहादादबाब दर्गाच्या मागे, मरीयम हाईटस, सय्यद नगर, महमंदवाडी रोड, हडपसर, पुणे असे सांगितले तसेच परीमंडळ ५ पथकाने त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने आणखी इतर ३ ते ४ साथिदार नामे १ अन्वर सलीम शेख वय २१ वर्ष, रा. नवीन म्हाडा कॉलनी बिल्डींग नं. २. ससाणे नगर रोड, हडपसर, पुणे २. रोहन ऊर्फ दिमाग सुरेश चितळे वय २३ वर्ष, रा. मार्कडे नगर, आण्णाभाऊ साठे हॉल जवळ, बैदवाडी, हडपसर पुणे ३. सिकदर ऊर्फ सिक्या अब्दुल रज्जाक वाडीकर वय २४ वर्ष, रा. चितामणी नगर, गल्ली नं. ४, झंडेवाडी रोड, हडपसर, पुणे ५. विधिसंपत बालक .. यांची नावे सांगितल्यानंतर त्यानाही काहि वापराला वाया घेण्यात यश आले.उपरोक्त आरोपीचे पुर्ण रेकॉर्ड तपासले असता सदर आरोपी वानवडी पोर पर पो.स्टे. पोवारजे माळवाडी पो रहे थे रेकोर्ड वरील गुन्हेगार असल्याचे दिसून आले आहे. तसेच ते सय्यद नगर व हडपसर भागात दहशद करत असल्याने यावर पक्ष होते. सदर आरोपी है गजा झाल्याने सदर भागातील दहशद व गुन्हेगारी कमी होणेस मदत होईल असे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. अशा प्रकारे परमंडल पथकाला केवळ काही वासातच परत एकदा ५ आरोपी जेरबंद करण्यात यश आले आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. रितेशकुमार सो. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक सो. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा सो अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. विकांत देशमुख, पोलीस उप आयुक्त सी. परिमंडळ ०५ पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली परिमंडळीय ५ चे पाहिजे व फरारी आरोपी शोध पथकाचे अंमलदार राजू कदम, अमित जाधव. आनंद पाटोळे, सर्फराज देशमुख, नासेर देशमुख, जयदेव भोसले व ज्योतीष काळे यांनी केली आहे.