नेहाताई शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन.
✒️राज शिर्के मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील मालाड परिसरात काही दिवसा आगोदर भिषण आग लागली होती त्या आगीत मालाड परिसरातील अनेक झोपड्या जाळून खाक झाल्या त्यामुळे अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. जीवन उपयोगी साहित्य, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य पुर्ण जाळून राख झाल आहे. या जळालेल्या झोपडी धारकांना शासनातर्फे योग्य ती मदत मिळणे बाबत आजाद समाज पार्टी (महिला मोर्चा) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
मुंबई मालाड येथील लागलेल्या भिषण आगीत भस्मसात झालेल्या सुमारे दोन हजार झोपडी धारकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेली ५०,००० ही तूटपूंजी रक्कम ही बेघर झालेल्या लोकांच्या भावनांची केलेली चेष्टा असून आपण त्वरीत यात सुधार करावा व त्यांच्या आर्थिक व मानसिक स्थितीचा विचार करून शासनाने पुढील प्रमाणे मागण्या मान्य कराव्या असे या निवेदनातून नेहाताई शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा यांनी मागणी केली.
१) प्रत्येक झोपडी धारकास रोख दोन लाख रूपये आर्थिक मदत द्यावी.
२) म्हाडा, हुडको व मुख्यमंत्री निधीतून पक्की घरे बांधून द्यावीत.
३) सदर परिसरातील लोकांना त्यांची घरे बांधून पूर्ण होईपर्यंत
४) बेघर परिवारातल्या विद्यार्थ्यांची एक वर्षाची शालेय फी माफ करावी.
५) आगीत भस्म झालेले महत्त्वाची कागदपत्र उदा. रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड वैगरे साठी सदर परिसरात शासनाच्या वतीने स्पेशल कॅम्प लावून कोणत्याही जाचक अटी न लावता त्यांना ती उपलब्ध करून द्यावीत.
सदर प्रोजेक्ट प्रामाणिकपणे पुर्ण होण्यासाठी शासनातर्फे IAS आयएएस दर्जाचे विषेश पुनर्वसन अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची नेमणूक करण्यात यावी. अशा प्रकारच्या मागण्या यानिवेदणातून करण्यात आल्या.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348