मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक: येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील वडाळा परिसरात पती आपल्याच पत्नीची हत्या केल्याची बातमी उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक मधील वडाळा परिसरात राहणाऱ्या पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नाशिक पोलिसांनी संशयित पतीस बेळ्या ठोकल्या आहे. आरोपी संशयित पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून मोबाईल फोनच्या चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली.
प्राप्त माहितीनुसार, नाशिक शहरातील वडाळा परिसरात राहणारा रिजवान पठाण हा त्याच्या पत्नी व मुलांसह राहत होता. तो वारंवार त्याची पत्नी निनाज रिजवान पठाण हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिच्याशी वारंवार भांडण करत होता. मारहाण पण करत होता. या कारणामुळे अनेकवेळा वाद होऊनही निनाज या आपला परीवार सांभाळत होत्या. मात्र काल मध्यरात्री तीन ते पाच वाजताच्या सुमारास रिजवान याने घरातील मोबाईल फोनच्या चार्जरच्या वायरच्या सहाय्याने त्याची पत्नी निनाजचा गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून रिजवान याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.