✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 28 मार्च रोजी महाराष्ट्र शासन व तालुका प्रशासन हिंगणघाट महाराजस्व अभियान अंतर्गत जनतेच्या प्रशासकीय कामांच्या सुलभतेसाठी कलोडे सभागृह हिंगणघाट येथे समाधान शिबीराचे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपस्थित लाभार्थीना माझ्या हस्ते देण्यात आला. आपल्या मतदार संघातील हे समाधान शिबीर हे राज्यभरात हिंगणघाट पॅटर्न म्हणून ओळखले जात असून आपल्या क्षेत्रातील चांगल्या अधिकारांची साथ लाभत असल्यामुळे हे सर्व शक्य होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, माजी न.पा. अध्यक्ष प्रेम बसंतानी, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनूले, तहसीलदार मासाळ, आशिष पर्बत शहर अध्यक्ष, न.पा मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, अन्नपुरवठा विभागातील टोंग, गंगाधर कोल्हे, अनिता माळवे, अनिल गहेरवार, दिनेश वर्मा, छायाताई सातपुते, संजय माडे, देवभाऊ कुबडे, अमोल राऊत, अमोल खंदार, मुन्ना त्रिवेदी, रविनाताई आखाडे, नलिनी सयाम, नरेशभाऊ युवनाथे, वंदनाताई कावंडी, पदमाताई कोडापे, सोनुभाऊ गवळी, सौरभ पाडे, शीतल खंदार, रवी रोहणकर, किशोर रोगे, कौशर अंजुम, ज्ञानेश्वर भागवते, किरणभाऊ वैद्य, प्रफुल बाडे, कमलाकर येसणसुरे, सुनील डोंगरे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.