विक्की डोके लाखांदूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हाच्या लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे लांडग्यांच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली. मनोहर वातू नान्हे रा. दोनाड असे त्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकून मनोहर वातू नान्हे यांना जाग आली. तेव्हा त्यांना हा प्रकार समजला.
या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली असून घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेत सदर पशुपालकाचे एकूण 30 हजाराचे नुकसान झाले असून पशुपालकासह गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.