29 मार्चला हिंगणघाट शहरात आंदोलन, सर्वांनी सामील होण्याची विनंती.
प्रशांत जगताप संपादक 7385445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तीन तालुक्याने मिळून हिंगणघाट विधानसभा क्षेत्र बनले. इतका मोठा तालुका असूनही एक पण सुसज्ज रुग्णालय तालुक्यांत नाही. ही राजकारणी नेत्यांचे अपयश मना की, तालुक्यातील नागरिकांना भगवान भरोसे सोडल्याचा आनंद.
आता पर्यंत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली पण हिंगणघाट तालुक्यातील नागरिकाच्या मोठं सुसज्ज रुग्णालयाचा प्रश्न सोडवू शकली नाही. हिंगणघाट तालुक्यात अनेक आमदार झाले पण ते तालुक्यातील लोकांचा आरोग्याचा प्रश्न सोडवू शेकण्यात कमी पडले. त्यामुळे तालुक्यांतील नागरिकांना उपचारासाठी जिल्हाचा स्थिकाणी वणवण करावे लागत असल्याची खंत आहे. काय अशा नेत्यांना आणि आमदारांना तालुक्यातील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न मोठा नाही वाटला काय? त्यामुळे विधानसभेत साधा प्रश्न पण निर्माण केला नाही.
त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्हात भव्य सुसज्ज वैद्यकिय महाविद्यालय बांधण्यात येणार आहे असा निर्णय घेतला. पण वर्धा जिल्हाचे मुख्यालय असलेल्या वर्धेत अगोदरच 3 सुसुज्ज वैद्यकिय रूग्णालय व महाविद्यालय आहे. त्यात वर्धेत परत वैद्यकिय महाविद्यालय झाले तर “जे तुपाशी आहे त्यांना परत तूप देणार, जे उपाशी आहे त्यांना वाऱ्यावर सोडणार अस होइल”
हिंगणघाट शहरात सुसज्ज असे वैद्यकिय महाविद्यालय व्हावे अशी तम्माम तालुक्यांतील नागरिकांची मागणी आहे. 29 मार्च ला भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.
यासाठी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय संंघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, प्राध्यापक, शिक्षक, डाॅक्टर, वकील, सुज्ञ नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांना सुचना करण्यात आली आहे की, हिंगणघाट शहर वैद्यकिय सुविधाच्या बाबतीत किती मागासलेले आहे याची आपणास कल्पना आहे. नविन होऊ घातलेले वर्धा जिल्ह्यातील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हावे या मागणीकरिता उद्या अधिकाधिक संख्येने निवेदन देण्याकरिता या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली.
आंदोलनाकरिता दि. 29 मार्च रोज बुधवार ला सकाळी 10.30 वाजता भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक येथे गोळा व्हावे. येथून तहसिल कार्यालयापर्यंत पायदळ चालत जाऊन निवेदन द्यायचे आहे. करिता अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे. हा आपल्या शहराच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कोणत्याही पक्षाचा नाही याचे भान असु द्यावे. प्रत्येकाने एक सामाजिक कार्य म्हणून व आपली नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकानी यात सामील व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.