अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं. 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 30 मार्च:- नांदागोमुख येथील गोमुख विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात सरस्वती प्रासादिक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.बाबुरावजी पाटील मोवाडे यांचा स्मृतीदिन संस्थापक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. नेमराज मोवाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ऍड.कृष्णराव मोवाडे, मोहनदास राठी, मोहनराव मोवाडे,मदनराव डहाके, वसंतराव निंबाळकर, काळे गुरुजी, सरपंच सौ.ज्योती मोवाडे, उपसरपंच माधव बावनकर, माजी मुख्याध्यापक गजानन वंजारी, अशोक डोंगरे,सेवा निवृत्त शिक्षक यादवराव दुरुगकर, खंते गुरुजी, मनभेकर गुरुजी, लांजेवार गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्वप्रथम बाबुरावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.शिरीष रंडखे व त्यांच्या गायन चमूने स्वागत गीत सादर केले.सतिश चीमलवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेचा अहवाल सादर केला.वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्व.बाबुरावजी मोवाडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शैक्षणिक,राजकीय,सामाजिक, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला.याप्रसंगी सामान्य ज्ञान स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा व क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश मोवाडे यांनी तर आभारप्रदर्शन जितेंद्र बालपांडे यांनी केले.याप्रसंगी गावातील व परिसरातील नागरिक,शाळेतील सर्व शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

