डाक विभागातील डाक सर्वेक्षक प्रशांत पाटील यांनी जनतेला मोलाचे मार्गदर्शन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 9420751809
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:– तालुक्यातील कमलापूर सब पोष्ट ऑफिस अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा ब्रांच पोस्ट ऑफिस हद्दीतील अनेक गावात जाऊन नागरिकांनसाठी पोस्ट विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबद्दल माहिती देण्यास छेल्लेवाडा येथील ब्रांच पोस्ट मास्टर सुधाकर गदरपल्लीवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी त्यांनी नागरिकांना पोस्टातील योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. पोस्ट ऑफिस बचत खाते, राष्ट्रीय बचत योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस वेळ ठेव योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत वेळ ठेव खाते, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, रूरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स जीआय असिसिडेन्ट पॉलिसी गावा गावात जाऊन कॉम्प घेऊन माहिती देण्यात आले आहे. यशस्वीसाठी पोस्ट खात्यातीलअभिषेक मोरे, निखिल साळवे, सौरभ मंगूलकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.आणि नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित होते.