सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात धोकादायक असे उच्च दाबाचे विद्युत तार गेले आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना होऊ शकते आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरून हे तार गेल्याने पुतळ्या शोभिकरणात कुठे तरी कमतरता दिसून येत होती.
बल्लारपूर शहरात दरवर्षी 14 एप्रिल, 6 डिसेंबर आणि विविध कार्यक्रमांच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. याच परिसरातून उच्च दाबाचे विद्युत तार गेले आहे. कधी विपरीत दुर्घटना घडन्याची शकता नाकारता येत नाही? त्यामुळे स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी या प्रश्नचा सतत पावपुरवठा केला. आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश आले आहे. 78 लाखाचे विकासकाम करण्यात येत आहे. भूमिगत विद्युत तार टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरची हायटेन्शन विद्युत तार काढण्यात येणार आहे.
सुमारे सहा महिण्यापुर्वी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचे शहर महासचिव उमेश ज.कडू यांचे नेतृत्वात व तालुका प्रभारी मधुकरजी उराडे, शहर उपाध्यक्ष विक्ष्वास देशभ्रतार, शहर सचिव प्रभुदास देवगडे, प्रकश तावाडे, पराग जांभुळकर, प्रसाद चव्हाण, दिलीप खैरे, प्रियंकेश सिंगाडे, मिलींद पुनेकर, दुरेश तेलंग, सत्यभामाजी भाले, वत्सला तेलंग, नम्रता साव आदि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थित देण्यात बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वाघ आणि वीज महावितरणाच्या साहाय्यक अभियंते बदकल यांना निवेदन देऊन संयुक्तरित्या मागणी करण्यात आली होती.
वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची व संभाव्य धोक्याचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने या हे वायर हटवून त्याजागी भूमिगत विद्युत वायर टाकायच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून प्रशासनाच्या कामाचे समाधान व्यक्त करण्यात आले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348