अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं.-9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील खापा नगर परिषद क्षेत्रात फार जुन्या मोडकळीस आलेल्या व जीर्ण झालेल्या इमारती दिसुन येते. या इमारतीमुळ नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून खापा नगर परिषद झोपेचे सोंग घेवून असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील अनेक भागात फार जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक इमारती असल्याने नागरिकांचा जिव धोक्यात आला आहे. नगरपरिषदने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून जीर्ण धोकादायक इमारतीच्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खापा शहरात 16000 च्या जवळपास लोकसंख्या, असलेल्या शहरात असंख्य जुन्या आणि जीर्ण मोडकळीसआलेल्या धोकादायक इमारती दिसून येतात. शहरातील किल्लापुरा, हनुमान घाट,माताखेडी,बाजार चौक परिसरात एकूण 30 इमारती धोकादायक असल्याची माहिती आहे.तर या व्यतिरिक्त शहरात असंख्य जुन्या आणि पडसर जीर्ण झालेल्या धोकादायक ईमारती दिसून येतात.परिसरातील पडक्या जीर्ण इमारती धोकादायक असल्याने त्या कधीही पडू शकते.त्यामुळे मोठी हानी होऊ शकते.मोठी घटना होण्याआधी नगरपालिकेने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.जीर्ण धोकादायक असलेल्या तीस इमारत मालकांना नगर प्रशासनाकडून नोटीस बजावली आहे. काही घर मालकांनी त्यांचे दुरुस्ती केली. पण काही धोकादायक मोडकळीस मकान कधीही पडू शकते. याकडे पालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. धोकादायक इमारत मालकांना नोटीस बजावून नगरपालिकेने औपचारिकता पूर्ण केली पण त्यांचेवर कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. शहरातील जीर्ण धोकादायक झालेल्या इमारतीपासून नागरिकांच्या जीव धोक्यात आहे. पावसाळ्यात या इमारतीपासून मोठा धोका होण्याची शक्यता नकारता येत नाही. मोठी घटना होण्याआधीच पालिका याकडे लक्षात देणार का?
नगर पालिका क्षेञातील अनेक इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे दिसुन येते.यातील काही दुमजली इमारती आहे.धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारत मालकांना नगर पालिकेने याआधी नोटीस बजावल्या आहे. माञ त्यानंतर नगर प्रशासनाकडुन कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपालिकेने धोकादायक जीर्ण इमारतीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.