मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांसह पालिका आयुक्तांना पत्र
श्री नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
836920575
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- राज्य सरकारने महिलांना एसटी बसेस मधून प्रवासा साठी 50 टक्के सवलत दिली त्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानताना ठाणे शहरातील कष्टकरी महिलांना टीएमटी बसेस मध्ये प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत द्या अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील व माजी नगरसेविका नंदा पाटील यांनी केली आहे.
याबाबतचे मागणी पत्र कृष्णा पाटील व नंदा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे महापालिका आयुक्त, परिवहन सभापती यांना दिले आहे.या पत्रात पाटील यांनी म्हटले आहे की, एसटी बसेस मध्ये प्रवासी भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत देण्याच्या राज्याच्या याच निर्णयाच्या धर्तीवर ठाणे महापालिका परिवहनच्या टीएमटी बसेस मधून शहरी कष्टकरी, नोकरदार महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता यावा यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घ्यावा.
ठाणे शहरातील अनेक महिला या नोकरी निमित्त जवळच्या शहरात किंवा एमआयडीसी मध्ये टीएमटी बसेसने दररोज प्रवास करत असतात.या महिलांना या योजनेचा लाभ होऊ शकतो. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना प्रवासात आपण दिलासा देणारा निर्णय घ्यावा अशी विनंती कृष्णा पाटील व नंदा पाटील यांनी या पत्राद्वारे केली आहे.
शहरी भागातील महिला या एसटी बसेसने प्रवास करत नसतात .बहुतांश महिला या शहर परिवहनच्या बसेसचा वापर करत असतात त्या दृष्टीने आपण निर्णय घेतल्यास बहुसंख्य कष्टकरी महिलांना या योजनेचा लाभ होईल असे कृष्णा पाटील व नंदा पाटील यांनी या मागणी पत्रात म्हटले आहे.