पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- तक्रारदार नामे धनेश सदाशिव म्हळसणे रा. मुक्ताई कॉम्प्लेक्स वडगांवशेरी पूणे हे दिनांक ३०/०३/२०२३ रोजी रात्री २२.३० वाजताचे सुमारास कल्याणीनगर अनीबीन कंपनीतून राहते घरी जात असताना जैन मंदिरासमोर, टेम्पो चौकाजवळ, वडगांवशेरी पुणे येथून कानाला मोबाईल फोन लावुन बोलत गायी चालत जात असताना पाठीमागुन आलेल्या दुचाकी वरील दोन इसमापैकी मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावुन दुचाकीवरुन पळ काढला. त्याअनुषंगाने सदर भागात पेट्रोलिंग करीता अधिकारी व अंमलदार यांना नेमण्यात आलेले होते. त्याप्रमाणे या परीसरात पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना रात्री २३.३० वाजताचे सुमारास बुध्दाज कॅफे, जुना मुंढवा रोड, गणेशनगर या ठिकाणी इसम नामे शुभम अतिश जगताप हे देखील फोनवर बोलत जात असताना त्याचे पाठीमागुन आलेल्या दुचाकी वरील दोन इसमापैकी गागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचा गोबाईल हिसकावुन दुचाकीवरुन पळ काढला. त्यावेळेस त्यांनी आरडाओरड केल्यामुळे सदर भागात गस्ती करीता नेमण्यात आलेले पोलीस अंमलदार शिवा धांडे व नामदेव गडदरे यांना घटनेबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपीत यांचा पाठलाग चालु केला.त्याचवेळी आरोपीत हे साईनाथनगर या ठिकाणी गाडी सोडुन नदिपात्राकडे पळुन जायु लागल्यानंतर पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यागधील एका आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपीस त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव शशांक श्रीकांत नागवेकर रा. केशवनगर, मुंढवा असे असल्याचे व त्याचे पळून गेलेल्या साथीदाराचे नाव अरमान बाबु शेख रा. कोलवडी, पुणे असे असल्याचे सांगितले. झाले घटनेबाबत तक्रारदार यांनी चंदननगर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार नोंद केले वरून चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. १४० / २०२३१ गुन्हा रजि. नं. १४२ / २०२३ मा.द.विकलम ३९२ ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे..
गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीत यांना अटक करुन त्यांचेकडुन मोबाईल जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणुन त्यांचकडुन रेडमी कंपनीचे ०२ मोबाईल फोन व होंडा कंपनीची ड्रीम युगा दुचाकी मोटार सायकल असा एकुण ६०,०००/- रुपये किंमतीचा गुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपी अरमान बाबु शेख रा. कोलवडी, पुणे याचेवर दोन गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. शशीकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ-४ पुणे शहर, मा. किशोरजाधव, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो. चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी गोरक्ष घोडके, पो. अंमलदार अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, शिवा धांडे, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, विकास कदम, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, गणेश हांडगर यांनी केली आहे….
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे हे करीत आहेत.

