राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुबई:- आज ऑनलाईन फसवनुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात लोकांच्या घामाचा पैसा हे चोरटे ऑनलाईन पद्धतीने लुटत आहे. अशीच एक घटना मुंबई येथील ग्रँड रोड भागात राहणाऱ्या एका व्यक्ती बरोबर घडली या फसवणुकीचा छळा लावायला मुंबई पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी झारखंड येथून दोन आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
ग्रँड रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला एसएमएसद्वारे फ्रॉड लिंक पाठवून सायबर ठगांनी त्याची 89 हजार रुपयांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी सायबर ठगांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नागेश्वर मालो ठाकूर आणि संतोष कुमार भालदेव मंडल या दोघांना अटक केली आहे. हे दोघे झारखंडमधील दुमका गावचे रहिवासी आहेत. फसवणुकीची घटना या वर्षी 5 जानेवारीची आहे. तक्रारदार इंटरनेटवर जेवणाच्या डब्याची सेवा पुरवणाऱ्याचे पर्याय शोधत होता. इंटरनेटवर त्याला एक नंबर मिळाला. त्यावर संपर्क केला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने एक लिंक पाठवली आणि सांगितले की, तुम्हाला आधी या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. तसेच त्याला ५ रुपये शुल्क भरण्यास सांगितले आणि त्याची 89 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.