वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली दि. 3 एप्रिल:- उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियन यांच्या मार्फत आपल्या निदर्शनास आणून देण्यात येते की, सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ असणारे पलुस तालुक्यातील अंकलखोप या गावी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सभेने पदस्पर्श होऊन पावन झालेले गाव आहे.येथील समाज बांधवांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर पवित्र अस्थी जतन केले आहेत. परंतु सदर ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश स्थापना उघड्यावर असून ग्रामपंचायत अंकलखोप यांनी सदर ठिकाणी दिवाबत्ती व सुशोभीकरणाची व्यवस्था केली नसल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश स्मारक हे अंधारात उभे राहिले आहे.स्मारकाची पडझड झालेली असून दुरावस्था झाली आहे.काहि दिवसांवर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून सांगली जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातून ही अनुयायी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अंकलखोप या गावी येतात परंतु या पवित्र ऐतिहासिक पावन भूमीकडे मात्र ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसतं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे पावित्र्य जतन करण्यासाठी असमर्थ ठरले आहे. यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
तत्कालीन राज्य मंत्री (सा.न्या.) महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि.२४.५.२०२२ रोजी झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी चबुतरा बांधणे काम पूर्ण करणे बाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करणेबाबत निर्देश देखील झालेले आहेत.तसेच शासन निर्णयानुसार शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्तींची स्मारक बांधणे तसेच अनुसूचित जातीसाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे या करीता प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग पुणे यांनी मौजे अंकलखोप ता.पलुस येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व स्मारकामध्ये डॉ.बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी चबुतरा बांधणे या कामासाठी रू २९,९०,५६७ चा प्रस्ताव समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी, सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सादर केला आहे. तसेच सदर प्रस्ताव प्रकल्पाचे अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांनी तयार केले आहे. या अंदाजपत्रकास त्यांनी मंजुरी दिली आहे. परंतु सादरचे प्रकल्प कोणत्या योजनेअंतर्गत पूर्ण करवायचा आहे. हे समाज कल्याण विभागास स्पष्टपणे त्यांनी पत्राने कळविले आहे तसेच मौजे अंकलखोप, ता.पलुस ग्रामपंचायत हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाच्या देखभाल व दुरुस्ती करीता आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने ते देखभाल करण्यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग यांच्या मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोट्यवधीं रूपयेचा खर्च केला जातो, परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे तसेच शासनाच्या अभिप्राया साठी वाट पाहावी लागत आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब म्हणावे लागेल, जर समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक, अस्थी, पुतळ्याची सुरक्षा व पावित्र्य राखण्यासाठी व्यवस्था अथवा मौजे अंकलखोप ग्रामपंचायत देखभाल दुरुस्ती कामासाठी तयार नसल्यास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगली जिल्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तसेच स्मारक आणि पवित्र अस्थी देखभाल दुरुस्ती जबाबदारी घेण्यास पूर्णपणे तयार आहे. कोणत्याही कारण पुढे न करता स्मारक व पुतळा उभारण्याचे कामाची वर्क ऑर्डर काढुन तातडीने काम पुर्ण करावे. आणि फुले शाहू आंबेडकरी जनतेच्या शुभेच्छा घ्याव्यात. अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियन यांच्या मार्फत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन उभा करावे लागेल, व होणाऱ्या नुकसानीला जिल्हा प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार राहणार असेल यांची गांभिर्याने नोंद घ्यावी.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, कोषाध्यक्ष हिरामण भगत, मेजर कुमार कांबळे, मेजर गौतम होवाळे, ऋषिकेश माने, मानतेश कांबळे, मऱ्याप्पा राजरतन, दीपाली वाघमारे, पवन वाघमारे, अनिल गाडे, युवराज कांबळे, योगेश कांबळे, जावेद आलासे, संगाप्पा शिंदे, इमरान बेपारी, संदीप कांबळे, किरण माने, हर्षवर्धन कांबळे यांच्या बरोबर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348