महागाई व इंधन दरवाढी विरोध करीत भाजप सरकार विरोधात देण्यात आल्या घोषणा.. महिलांसाठी अर्ध्या तिकिटांचे स्वागतच परंतु तीन चाकी ऑटो चालक-मालकांचा पोटावर पाय त्यांच काय…. रा. काँ पक्षाचे अतुल वांदिले यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे सवाल..
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ऑटो चालक युनियन द्वारे हिंगणघाट शहरांमध्ये आज महागाई व इंधन दरवाढ विरोधात मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला असून, सरकार विरोधात घोषणा देत शेकडोच्या संख्येने ऑटो चालक आपल्या ऑटो सह मोर्चात सहभागी झाले होते.
राज्य सरकारने बसेस मध्ये महिलांना अर्धे तिकीट केल्यामुळे ऑटो चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.यामुळें ऑटो चालक – मालक यांच्यावर उपसमारिची वेळ आली आहे, तसेच आजच्या वाढत्या महागाईच्या काळात पेट्रोल, डिझेल व सिलेंडर यांचे वाढत्या भावामुळे ऑटो चालक- मालक सह सर्वसाधारण जनता हि त्रस्त झाली आहे. त्यातच राज्य सरकारने महिलांना बसेस मध्ये अर्धे तिकीट केल्यामुळे ” ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे इंधन दर वाढ करायची व दुसरीकडे महिलांना एसटीच्या तिकीट दरात अर्धी सवलत द्यायची असा दुहेरी गेम शासनाकडून केला गेला असल्याने ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील ऑटो चालकावर उपासमारीची वेळ आली आहे.
पेट्रोल-डिझेल व सिलेंडर यांच्या वाढत्या भावामुळे जनता हवालदील झालेली आहे. तसेच ऑटो चालक मालक सुद्धा वाढत्या महागाईने हैराण झाले असून त्याना त्यांची व त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह कसा करावा ? हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल चे भाव अर्धे केले तर ऑटो चालक – मालक संघटना सुद्धा महिलांना ऑटो मध्ये ५०% सवलत देणार. राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी नाही केले तर ऑटो चालक – मालक संघटना आपल्या परिवाराला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी महागाई विरोधात नारे लावून सरकारचा जाहीर निषेध केला गेला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, सुनील भुते, संजय गांभुले, राजू मुडे, प्रशांत एकोणकर, सुशील घोडे,आदित्य बुटे ऑटो युनियनचे सदस्य इमरान शेख , महेश ठाकूर, मुक्तार शेख, नरेश भगत, अनुप डाहाके, अमोल भिसेकर, अनिल कांबळे, शरद दुर्गे, रामा कांबळे, मतीन शेख, फिरोज शेख, विनोद वाघमारे, विष्णु बावणे, गजानन झाडे, सतीश जकनवार, किशोर दुधळकर, बालु घोटेकार, संजय हेडाऊ, प्रदीप जुमदे, जीतू हेडाऊ, अस्त्याम खान, शेख इरशाद, साजिद अहमद, किरण घोगसे, राजू सावध, स्वप्नील दाते, अक्षय पाटील आदी ऑटो युनियन सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/ 7385445348