सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. स्थानीक किल्ला वार्ड येथील केशव खडतकर याने आपल्या राहत्या घरात गळा फास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक केशव आपल्या आई बरोबर एकाच घरी राहायचा. मृतक यांना एक मुलगा दोन मुली असून यांचा मुलगा अमरावती येथे राहायचा, एक मुलगी नागपुर व दूसरी मुलगी नांदेड़ येथे राहते. मृतक यांची पत्नी मुलाजवल राहते. मृतक केशव हा व्यसनाधिन तो दारूच्या आहारी गेल्याने 24 तास नशात राहत होता. त्या नशेच्या अवस्थेत त्याने गळा फास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू व्यवसाय फोफावला आहे. बल्लारपुर शहरतील प्रत्येक की रस्तात गल्लीत दारूची दुकाने उघडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. तरुण युवा वर्गापासून ते शालेय विद्यार्थी व्यसनाचे आदी होत आहे. या व्यसनाधिन माहौल मुळे सर्वात जास्त महिला त्रास भोगावा लागत आहे. शहरातील अशा दारूच्या दुकानावर शासन आणि प्रशासनाने कारवाई करून बल्लारपूर शहर व्यसनमुक्त कण्यासाठी पहल करावी अशी मागणी शहरातील महिला आणि नागरिक करत आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

