सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर मो.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा (पश्चिम विभाग) अंतर्गत तालुका शाखा राजुराच्या वतीने दि.२४ मार्च ते २ एप्रिल २०२३ पर्यंत “तक्षशिला बुद्ध विहार गोवरी” तालुका राजुरा येथे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीर चे आयोजन करण्यात आलेले होते. दि २ एप्रिल २०२३ ला शिबीराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
या शिबिरामध्ये सर्व प्रथम गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रजलीत करून त्रिशरण पंचशील घेवून पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला असंख्य उपासीकानी महिलांनी सहभाग घेऊन धम्माचे प्रशिक्षण घेतले. तसेच राजुरा येतील उपासिका आयु.नी.वंदना देवगडे, किरण खैरे, माला तामगाडगे, सोनाबाई काबळे , प्रेमिला नले, शुभांगी धोटे, कुसुम कातकर यांनी भेट दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे भा. बौ. म राजुरा तालुका अध्यक्ष होते. प्रमुख उपस्थितीमध्ये अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष, इंजी.नेताजी भरणे, जिल्हाध्यक्ष भा.बौ. म. चंद्रपूर, शिबिराचे मार्गदर्शक कविताताई अलोणे केंद्रीय शिक्षिका, सपनाताई कुंभारे, जिल्हा उपाध्यक्ष, प्रचार व पर्यटन विभाग, गायत्रिताई रामटेके केंद्रीय शिक्षिका व शहर अध्यक्षा बल्लारपुर, संदीप सोनोणे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, मिलीताई वाघ, पंचफुला वेल्हे, अनुकला वाघमारे, केंद्रीय शिक्षिका, गोैतम चोैरे, सरचिटणीस, भिमराव खोब्रागडे हे होते. तर सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत गीत भिमराव खोब्रागडे तर प्रास्ताविक प्रा. दिनेश घागरगुंडे आणि संचालन किरणताई खैरे, वंदना देवगडे, सपना कुंभारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन इंजि. राहुल भगत यांनी केले. तर प्रारंभी प्रशिक्षणार्थी बहुसंख्य महिलांनी आपले दहा दिवसामध्ये जे शिकायला मिळाले त्याबद्दल अनिता कास्वटे, आचल घागरगुंडे, वनिता करमनकर, अर्चना कास्वटे यांनी मनोगत व्यक्त केले.
या शिबीरामध्ये दहा दिवसात सर्वच विषयांवर कविताताई अलोणे केंद्रीय शिक्षिका यांनी उत्तम तर्हेने शिकविल्याबद्दलची पावती दिली, त्याबद्दल रमाई महिला मंडळ गोवरीच्या अध्यक्षा कविताताई अलोने व जीवनकुमार अलोणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सपना कुंभारे आणि महेश कुंभारे सर यांचे अभिनंदन केले. आज “मी रमाई बोलतय “या एकपात्री १०१ वा भावसंवाद हा प्रयोग गायत्रीताई रामटेके केंद्रीय शिक्षिका व शहर अध्यक्षा बल्लारपूर यांनी रमाई ची जीवनावर संपूर्ण माहिती अगदी जन्मापासून ते मरणापर्यंत ची माहिती सांगत असताना उपासक व उपासिकांच्या डोळ्यात अश्रू येत होते जणू काय रमाईच्या चित्रपट सारखा दीड तास चालू होता तिचे सर्वत्र कौतुक करत होते त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने सर्वच प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र आणि संस्थेचे बौद्ध जीवन संस्कार पाठ सुत्तपठन चे पुस्तक देऊन गोैरविण्यात आले.
या शिबिराला दहा दिवस प्रशिक्षण देणाऱ्या कविताताई अलोणे, गायत्रीताई रामटेके केंद्रीय शिक्षिका, क्षमा घागरगुंडे, अनुसया वाघमारे आजी आणि भिमराव खोब्रागडे, यांचा रमाई महिलां मंडळ गोवरीच्या अध्यक्षा अनिताताई कास्वटे व उपासिकानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी सर्वा करीता संबुद्ध पंचशील युवा मंडळाने सुंदर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. तक्षशिला बुद्ध विहार गोवरी येथील सदर कार्यक्रम अविस्मरणीय झाला. या कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रसंगी पाहुण्यांचा झालेला आदर सत्काराचे स्वरूप पाहुन पाहुण्यांचे मन भारावून गेले.इतरांना बोध घेण्यासारखा प्रसंग होता. राजुरा तालुका शाखेचे अध्यक्ष.धर्मुजी नगराळे सरचिटणीस, गोैतम चोैरे, कोषाध्यक्ष, गौतम देवगडे, प्रा.दिनेश घागरगुंडे, इंजि.राहुल भगत, सिद्धार्थ कास्वाटे, अनिता कास्वटे तसेच सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे चंद्रपूर जिल्हा, तालुका व शहर शाखेतर्फे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद आणि सहर्ष आभार व्यक्त करण्यात आले. असेच भारतीय बौद्ध महासभा च्या कार्यास सहकार्य करावे आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब यांनी दिलेला विज्ञान वादी बौद्ध धम्म घरा घरात पोहचवावा अशी मंगलकामना करण्यात आली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348