दरवर्षी संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिला पुरस्कार.
प्रशांत जगताप संपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- परिवर्तन विचार मंच यांच्यावतीने दिले जाणारे 2023 या वर्षीचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. एकूण 11 पुरस्कार या वर्षी दिले जाणार आहेत.
राज्यातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्य, पत्रकारिता, समाजकार्य प्रबोधन, लेखक, कवी, विचारवता सह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा परिवर्तन विचार मंचकडून दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. यावर्षी पण कौतुकास्पद कार्य करणाऱ्या 11 नागरिकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. सर्व सन्मान पुरस्कारांचे वितरण दि. 13 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वसंध्येच्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
यांना दिला जाणार पुरस्कार..
1) लक्ष्मण लोखंडे : परिवर्तन जीवन गौरव सन्मान पुरस्कार व रोख रक्कम. 2) कल्पना टेंभुर्णीकर: वामनराव गोडबोले सन्मान पुरस्कार 3) प्रणोती कळमकर : पंडित रेवाराम कवाडे सन्मान पुरस्कार 4) डॉ. अशोकानंद देशभ्रतार: प्राचार्य प्रल्हाद गजबे सन्मान पुरस्कार 5) डॉ. मोनाली पोफरे : ताईबाई जनार्दन मवाडे सन्मान पुरस्कार 6) सुनंदा गायकवाड : राधाबाई कांबळे सन्मान पुरस्कार 7) दिवाकर शिर्के : कवी – गायक उत्तम मुळे सन्मान पुरस्कार 8) दादाराव पाटील : नामांतर शहीद जनार्दन मवाडे सन्मान पुरस्कार. 9) डॉ. स्मिता मेहेत्रे : मुकनायक वृत्तपत्र सम्मान पुरस्कार 10) डॉ. सुशिल मेश्राम : डॉ. आनंद जीवने सन्मान पुरस्कार, 11) प्रा. माधुरी गायधनी : बाबू हरदास एल. एन. सम्मान पुरस्कार
वार्षिक सन्मान पुरस्कार संयोजन समिती विलास गजभिये, भदंत नागदिपांकर, प्रा. भीमराव गायकवाड, रमेश गजभिये, भूपेश वराडे, डॉ. सुनंदा जुलमे, सुजाता लोखंडे
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348