पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दत्तवाडी पोलीसांची कारवाई पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठांकडुन वेळोवेळी प्राप्त पाहिजे व फरारी आरोपी पकडण्याचे आदेशानुसार दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे आदेशान्वये दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे व त्यांचे पथक दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत पाहिजे व फरारी, रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना पोलीस हवालदार कुंदन शिंदे व पोलीस नाईक अमित सुर्वे यांना खास बातमीदाराचे मार्फतीने बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस ठाणे गु. रजि. नं. ७९५/२०१८ भा.द.वि. कलम ३९४, ३४ व गु. रजि.नं. ८४५ / २०१८ भा.द.वि. कलम ३९४ ३४ मध्ये गुन्हा घडल्यापासून पाहिजे फरारी आरोपी नामे प्रकाश शरन्नाप्पा बिराजदार वय ३० वर्षे, रा. गल्ली नं. ०३ जयभवानीनगर जनता वसाहत पर्वती पायथा पुणे हा त्याचे घरच्यांना भेटण्यासाठी राहते घरी येणार आहे. वरील बातमी नुसार तपास पथक कर्मचा-यांनी रात्रभर जनता वसाहत येथील गल्ली बोळात व डोंगरावर सापळा लावून वरील आरोपीस त्याचे घराजवळील गल्लीमध्ये कौशल्याने पकडले. आरोपीकडे दाखल गुन्हयांबाबत चौकशी करताना त्यांने वरील दोन्ही गुन्हे स्वतः व त्याचे साथीदार नामे १) ऋषीकेश ऊर्फ हुक्क्या श्रीकांत गाडे रा. अप्पर इंदिरानगर पुणे २) प्रतिक जयेश येवले रा. मु/पो- गंगापुर ता आंबेगाव ३) कुलदीप हरीओम वाल्मीकी रा. उत्तमनगर यांचेसह केल्याचे कबुल केले.आरोपीनी मिळुन सुमारे पाच वर्षापूर्वी सन २०१८ मध्ये दि. ११ / १२ / २०१८ व दि. ३१/१२/२०१८ रोजी पायी जाणाऱ्या व मोटार सायकल वरील वाहन चालकाला लुटून कुन्हाडीने मारहाण करून त्यांचेकडील मोबाईल, सोन्याची अंगठी, सोन्याची चैन, पैसे व इतर सोन्याचे दागिने चोरी केली होती. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणेकडील वर नमुद दाखल गुन्हयांमध्ये वरील आरोपीना अटक झाली असुन प्रकाश बिराजदार हा पोलीस कारवाईचे मितीने त्यांचे मुळगाव मु/पो- बिबळगी ता- सिंदगी जि- विजापुर राज्य कर्नाटक याठिकाणी लपुन बसला होता. दि. ०४/०४/२०२३ रोजी आरोपी घरच्यांना भेटण्यासाठी आला असता पोलीसांनी त्याला पकडले आहे. त्याचेसह आरोपींपैकी ऋषीकेश ऊर्फ हुक्क्या श्रीकांत गाडे हा सहकारनगर पोलीस ठाणेकडील गुन्हयांत मोक्का अंतर्गत अद्यापही जेलमध्ये आहे. आरोपी प्रकाश बिराजदार हा पुणे ग्रामीण व शहर पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यावेवर यापुर्वी दरोडा, खुनाचा प्रयत्न, प्रणघातक हत्यार वापरणे तसेच जबरी दुखापत करून चोऱ्या करणे यासारखे गंभीर गुन्हे पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस ठाणेमध्ये दाखल आहेत.
पुढील कारवाईकामी सदर आरोपीस कोंढवा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्यांचेकडुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे साो, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ३, पुणे मा. सुहैल शर्मा सो, सहाय्यक पोलीस आयुक्त सो, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर मा. राजेंद्र गलांडे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पो.अं. अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, अनिस तांबोळी, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे-पाटील, प्रमोद भोसले, प्रशांत शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, अमित चिव्हे यांनी केली आहे.