संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
तुलना:- मौजा तुलाना या गावात ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने दिनांक १४ ऑगस्ट रोजी खुशी महिला ग्रामसंघाच्या वतीने सद्दभावना रॅली काढण्यात आली. प्रतेक महिला व शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा होता. भारत माता कि जय च्या नाऱ्याने संपूर्ण गाव दणाणून गेलं. गावात घरोघरी तिरंगा लावण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तिन दिवस अमृत महोत्सवाचा उत्साह मोठ्या आनंदात तुलाना या गावात पार पडला.
१५ ऑगस्टला जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. रॅलीत व ध्वजारोहण कार्यक्रमात, तुलाना गावातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, खुशी महिला ग्रामसंघाच्या महिला, गावातिल प्रतिष्ठित नागरिक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शाळेचे शिक्षक, गटाच्या सीआरपि भावना मडावी, सामाजिक कार्यकर्ते दिपक मडावी हे उपस्थित होते.