प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबजनक माहिती समोर आली आहे येथे वर्धा पोलिस अधीक्षक यांचे नाव सागून चक्क पोलीस अधिकाऱ्याची हजारो रुपयाने फसवणूक केली. ही घटना समोर येतात संपूर्ण जिल्हा पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली.
मी पोलिस अधीक्षक साहेबांचा गोपनीय बातमीदार आहे. शहरात मोठा जुगार सुरू असून तेथे बनावट ग्राहक पाठवायचा आहे. त्याला मोबाईल घेण्यासाठी ३४०० रुपये खात्यावर पाठवा, असे म्हणत चक्क पोलिस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकातील पोलिसांचीच अज्ञाताने भामट्याने फसवणूक केली. याप्रकरणी रामनगर पोलिसात दि४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षकांच्या मोबाईलवर अज्ञाताने संदेश पाठवून रामनगर हद्दीत जुगार सुरू असल्याची माहिती दिली. पोलिस अधीक्षकांनी सदर मोबाईल क्रमांक क्राईम इंटेलिजन्स पथकातील अधिकाऱ्याच्या बातमी मोबाईलवर पाठविला. अधिकाऱ्याने मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता त्याने मी पोलिस अधीक्षक साहेबांचा गोपनीय खबरी असल्याचे सांगितले. तसेच जुगार
अड्डयावर एक बनावट ग्राहक पाठवायचा असून त्याला मोबाईल घेण्यासाठी ३४०० रुपये माझ्या
खात्यावर पाठवा, असे सांगितले. पोलिस अधिकाऱ्याने ३४०० रुपये खात्यावर पाठविले अन् संपर्क केला असता अज्ञाताने कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसून पोलिसांचीच फसवणूक केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.