Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ‘वाहनचोरीचे १४ गुन्हे उघड किं. रू १०,००,०००/- चा मुद्देमाल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 6, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ‘वाहनचोरीचे १४ गुन्हे उघड किं. रू १०,००,०००/- चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी आठवडा मिटींग (WRM) मध्ये पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्याबाबत कारवाई करणेबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी देखील हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकारी यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या वरीष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला.त्यानुसार तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे, सपोनि अविनाश शिंदे, पोउपनिरी. पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, अनिरुद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, मनोज सुरवसे, अमोल दणके, असे पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना, एक इसम संशयीत रित्या दुचाकी सह मिळून आला. नमुद इसमाकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारता त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास पोलीस ठाणेस घेवून येवून त्याचेकडे तपास करता, आरोपी नामे परशुराम ऊर्फ परश्या शिवाजी मोरे वय २४ वर्ष रा. सध्या मु.पो. कोळवीरे, ता. पुरंदर जिल्हा पुणे मुळगाव :- मु.पो. कलहिप्परगा ता. अक्कलकोट जिल्हा सोलापुर याने पुणे शहर, पिंपरी चिंचवड, बारामती, सोलापुर, कर्नाटक या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचेवर सोलापुर शहर / ग्रामीण येथे मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.आरोपी नामे परशूराम ऊर्फ परश्या शिवाजी मोरे वय २४ वर्ष रा. सध्या मु.पो. कोळवीरे, ता. पुरंदर जिल्हा पुणे मुळगाव :-मु.पो. कलहिप्परगा ता. अक्कलकोट जिल्हा सोलापुर यास हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४७५ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करून एकूण १४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकूण १४ गुन्हे उघडकीस झाले असून किं. १०,००,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये ३ होंडा युनिकॉर्न २ अॅक्टीव्हा, २ हिरोहोंडा पेंशन, २ होंडा शाईन, १ ज्युपीटर. १ हिरो स्प्लेंडर, १ बजाज प्लॅटीना, १ हिरो होंडा डिलक्स, १ बुलेट अशा १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उघडकीस आलेले गुन्हे आणि पो.स्टे पुढीलप्रमाणे.
हडपसर पो.स्टे ०७, भोसरी पो.स्टे ०२, आणि लोणीकंद, विश्रामबाग, बारामती, विजापुर पो.स्टे सोलापुर, इंडी,कर्नाटक याठिकाणी प्रत्येकी ०१ असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

आरोपी हा मोलमजुरीचे काम करतो. त्यास वेगवेगळ्या गाडयांची आवड असल्याने तो वाहने चोरून मुळगावी जात असे व परत पुण्यात येत असे. तसेच काही वेळेस बारामती, सोलापूर, विजापुर कर्नाटक या ठिकाणाहून येताना देखील दुचाकी गाड्या चोरून आणून त्याचा वापर करीत असे.

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कणिक, मा. सह पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख साो, पॉलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अरविंद गोकुळे गो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री दिगंबर शिंदे सो पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे सो पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिद, पोलीस अंमलदार, संदीप राठोड, समिर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंचरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अजित मदने, रशिद शेख, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, सचिन रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Previous Post

वर्धा पोलिस अधीक्षक यांचे नाव सागून चक्क पोलीस अधिकाऱ्याची हजारो रुपयाने केली फसवणूक.

Next Post

हिंगणघाट शहरात हनुमान जन्मोत्सव भक्तिपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट शहरात हनुमान जन्मोत्सव भक्तिपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

हिंगणघाट शहरात हनुमान जन्मोत्सव भक्तिपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In