✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय प्रत्येक हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध हनुमान मंदीरात जन्मोत्सव निमित्त भाविक भक्तांनी भल्या पहाटे पासून गर्दी केली होती. भजन पूजन करून हनुमानाची आराधना केली. यासोबतच ठिकठिकाणी प्रसाद आणि महाप्रसाद आयोजन विविध संस्था संघटने द्वारे करण्यात आले होत.
राष्ट्रीय महामार्गावरील मोठा मारुती देवळात ही आज भाविक भक्तांनी गर्दी केली. तिथे ही प्रसाद महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष विठ्ठल गुळघाने यांनी भाविक भक्तांसाठी फळ वाटप चां अभिनव कार्यक्रम आयोजित केला. येणार्या सर्व भाविक भक्तांना त्यांनी अंगुर आणि सफरचंदच्या प्रसादाचे वाटप केले. ज्यामुळे त्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. या दिवशी बरेच लोक उपवास करतात आणि अश्या वेळी चना पोहे सारखे प्रसाद बरेच लोक घेत नाही. पण फळ असल्यामुळे सर्वांनी प्रसादाचा आनंद घेतला.