देशाला स्वाधीनतेकडे नेण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : प्रा. अतुल देशकर.
निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
ब्रह्मपुरी:- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने बेटाळा- चौगाण फाटा येथे भव्य दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दौड स्पर्धेत परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. भर पावसात साडेतीनशे युवकांनी दौड करत स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात आपला सहभाग नोंदविला.
ही स्पर्धा पाच गटांमध्ये पार पडली यामध्ये मुलांचे 3 व मुलींचे 2 अशा पाच गटांत विभागणी करण्यात आली होती. मुलांमध्ये १० ते १४ वर्ष, १५ ते १८ वर्ष व १८ वर्षावरील असे तीन गट होते. तर मुलींमध्ये १० ते १४ व १५ व त्यावरील असे मुलींचे गट होते.
याप्रसंगी अखंड भारत दिनानिमित्य भारत माता पूजन करण्यात आले त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. १० ते १४ वर्ष या मुलींच्या गटा मध्ये हर्षाली वाढई यांनी प्रथम, कु. गायधने यांनी द्वितीय तर काजल पोहनकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर १० ते १४ वर्ष या वयोगटातील मुलांमध्ये निकुंज किरमिरे, रितांशु मिलमिले व रितेश बुराडे यांनी बाजी मारली. मुलांच्या १५-१८ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक वंश ढिवसे, द्वितीय प्रणय मेहकर, तृतीय नयन नेरकर यांनी बक्षीस जिंकले. तर मुलींच्या १५ वर्ष व त्यावरील वयोगटामध्ये लावण्या नागरकर, नंदिनी मैंद, साक्षि मैंद विजयी ठरले व १८ वर्षावरील मुलांमध्ये प्रवीण लांडे, अनिकेत बुल्ले, भुवनेश्वर कन्नमवार यांनी बाजी मारली. स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व तिरंग्याचे वितरण यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे या फाट्यावरील महाराष्ट्र डी. फार्म कॉलेज येथील हॉलमध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार, भाजपा नेते प्रा. अतुल देशकर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांची उपस्थिती होती. देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले, आता देशाला स्वाधीनतेकडे नेण्यासाठी युवकांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन माजी आमदार अतुल देशकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. तर संजय गजपुरे यांनी स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. बालपांडे, ज्येष्ठ नेते प्राचार्य अरुण शेंडे, भाजपा जिल्हा सचिव रश्मी पेशने- खानोरकर, पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रा. रामलाल दोनाडकर, भाजपा शहर महामंत्री मनोज भूपाल, साकेत भानारकर, राजू शिवरकर, अभय कुथे, मनोज मैंद, श्रीहरी बुराडे, मदन मैंद, अविनाश मस्के उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर व युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे यांनी केले. तर आभार भाजयुमो जिल्हा कार्य सदस्य लीलाराम राऊत यांनी मानले. या स्पर्धेच्या आयोजना साठी चौगाण स्पोर्ट्स अकॅडमीच्या गणेश मालोडे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधेशाम ठाकरे, विनोद बुराडे, धीरज पाल, तेजस दोनाडकर, सचिन ठाकरे, दीपक ढोंगे, नंदू दिवठे, ताराचंद पारधी व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कार्य केले.