सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन वाशिम:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात सामाजिक न्याय समता पर्व राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ८ एप्रिल रोजी वनोजा येथील श्री. शिवाजी मागासवर्ग मुलांचे वसतीगृह तसेच जिजामाता मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आयोजित शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. धोटे यांच्यासह श्रीमती पावरा, दुर्गाताई लाड, श्रीमती रजनी पत्रोडीया आदींनी शिबिरात ३७ विद्यार्थी व ३४ विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी करुन वैद्यकीय सल्ला दिला.
यावेळी सरपंच मुखमाले, वसतीगृहाचे संचालक विठ्ठलराव पाटील यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.