हरियाणा येथील महाबली हनुमान जनतेच्या आकर्षणाचा केंद्र, लोकांची तुडुंब गर्दी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आल्लापल्ली:- टायगर ग्रुप आल्लापल्ली तर्फे भव्य हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग चौक व श्रीराम मंदिर येथे राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच संध्याकाळी मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली या मिरवणुकीत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून श्री हनुमानाचे पूजन व आरती करीत भक्तीभावाने दर्शन घेतले. तसेच पायदळी ह्या शोभायात्रेत सहभागी झाले तसेच उपस्थित भक्तगणांना राजेंनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिले.
यावेळी युवकांचा आग्रहास्तव अम्ब्रिशराव आत्राम यांनी डीजेच्या तालावर राजे ठेका ही धरला तसेच ह्या शोभायात्रेत हरियाणा येथील महाबली हनुमान जनतेच्या आकर्षणाचे मोठे केंद्र होते, ह्या शोभा यात्रेत लोकांची तुडुंब गर्दी झाली होती. याप्रसंगी अहेरी व आलापल्ली येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.