श्याम भुतडा, बीड प्रतिनिधी
बीड:- येथील आदित्य शिक्षण संस्थे च्या विविध महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी (ता. 15) स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष – सुभाषचंद्र सारडा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात निमित्त शासनाच्या निर्देशानुसार 13 ते 15ऑगस्ट दरम्यान आजादी का अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान हरघर तिरंगा भव्य जनजागरण रँली, विप्र नगर, नळवंडी नाका परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मोफत राष्ट्र ध्वजाचे वाटप कार्यक्रमासह चित्रकला,फेस पेंटिंग,निबंध, वक्तृत्व, महाविद्यालय सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 13 व 15 ऑगस्ट या तीन दिवस ध्वजवंदन कार्यक्रम घेण्यात आला.13 तारखेला सी ए गिरश जी गीलडा तर 14 तारखेस डॉ मुडे सरच्या हस्ते ध्वजारोहणं झाले. तर सोमवारी (ता. 15) स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थें चे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा साहेबाच्या हस्ते झाले त्या नंतर बक्षीस वितरण करण्यात आले.
या समारोहाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा , संचालक शरद सारडा, संचालिका आदिती ताई सारडा, प्रशासकीय अधिकारी डॉ. मुंडे, प्राचार्या भूतडा सर , हिंगणे सर,कचरे सर, हिमाशु सर, सानप सर, कुलकर्णी सर, श्रद्धा मॅडम, शिंदे मॅडम,यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा साहेबा च्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्वराज्य महोत्सवातंर्गत आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रम त सारडा साहेबांनी आपल्या मार्गदर्शक पर भाषण नात यश आणि चिकाटीने मेहनत केली कि सर्व मिळते. तसेच आपण केलेल्या प्रगतीने आपले पालक हीं समाधानी होतात त्यामुळे अभ्यासात लक्ष घालवे बाबत सर्वाना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रम चे सूत्रसंचालन डॉ हिंगणे सर तर आभार प्रदर्शन भूतडा सर नी केले.