डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- जा’ सांगा मम बंधूजना…. आलो जिंकूनी या मरणा ‘मरण जिंकले.. येशु राजाने…. अशी गीते म्हणत चर्चमधील प्रार्थना आणि प्रवचनानंतर एकमेकांना’ प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. हॅपी ईस्टर’ म्हणत शुभेच्छा दिल्या. भक्तिमय आणि उत्साही वातावरणात रविवार दिनांक 9 एप्रिल ला ख्रिस्ती बांधवांनी पुनरुत्थानाचा दिवस म्हणजेच ईस्टर संडे साजरा केला आहे. या सणा निमित्त सुरू असलेले पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसाच्या उपासाची ही रविवारी सांगता झाली.
पवित्र वधस्तंभावर प्राणअर्पण केल्यानंतर प्रभु येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुनरूत्थित झाले. त्याची आठवण आणि येशूने मरणावर विजय मिळवला त्यानिमित्त ईस्टरसंडे साजरा केला जातो. शहरात विनि यार्ड चर्च, दापोडी, सेंड अँडरुज चर्च, सेंट मेरी चर्च, खडकी, दि युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट, कामगार नगर, पिंपरीतील आवर लेडी कन्सोलर चर्च लेडी चर्च चिंचवड मधील सेंट झेवियर चर्च, काळेवाडीतील सेंट अल्फाल्सो, चर्च निगडीतील इन्फंट चर्च, सेंड अँथोनी चर्च, काळेवाडीतील केडीसीचर्च, पिंपरी गावातील हिंदुस्थानी कवहनंट चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानचे महत्त्व सांगणारा संदेश दिला. सर्व चर्च पहाटेपासून भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. चर्च महिला मंडळाने पहाटेची सेवा केली. शहरातील विविध चर्च मधून इन्स्टरच्या पूर्व संधी निमित्त शनिवार रात्री तसेच रविवारी विशेष उपासना विधीचे आयोजन करण्यात आले होते. ईस्टर हा प्रभू येशू प्रति आपले प्रेम प्रगट करण्याचा खास दिवस असतो. संडे निमित्त शनिवारी रात्रीपासून रविवारचे पहाटेपर्यंत प्रेयर ग्रुप मध्ये विविध कार्यक्रम झाले.
शहरातील पिंपरी ,भोसरी ,आणि देहूरोड परिसरात खिस्ती बांधवांनी पुनरुत्थान रॅली काढली. प्रभू उठला आहे ,खरोखर उठला अशा घोष फलक घेतले होते.
पास्टर अँड लीडर ट्रस्ट भोसरीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोसरी येथून पुनरुत्थान रॅली काढण्यात आली. यावेळी विशेष सॅमुवेल साखरपेकर, विशप प्रदीप चांदेकर, अनिश विजागत, डॉ. विजय फुरताडो, अशोक निकाळजे, डॉ. प्रवीण रणदिवे, विधी अधिकारी प्रसाद सांगळे, अॕड. बाजीराव दळवी ,निलेश वानरे, समीर बनकर, डेव्हिड काळे आदींनी सहभाग घेतला.
ख्रिश्चन लीडर्स प्रेयर फेलोशिपच्या (CLPF)च्या वतीने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ही झाली काढण्यात आली. यनगर मार्गे अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी ते मोरवाडी मार्गे ती पुढे गेली. मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव त्यात सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व पास्टर डॅनियल अंथोनी यांनी केले. पास्टर सुधीर पारकर, मोजेस वाघमारे, रेजी थॉमस, भगवान म्हात्रे, वर प्रसाद मार्क, स्नेहल डोंगरदिवे ,सुनील जाधव, रिचर्ड गजभिव, गौरव चव्हाण, शहरातील अनेक धर्मगुरू व हजारो ख्रिस्ती बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.