कार्याध्यक्ष मंगेश लोळगे, महासचिव सूर्यकांत महाजन, तालुका महासचिव श्याम भंडारी
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीड जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक शनिवार दि.8 एप्रिल रोजी हॉटेल अन्विता येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेबंर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे संस्थापक सत्यनारायण लाहोटी हे होते. तर मराठवाडा चेंबर्सचे वाय.जनार्दन राव, राजेंद्र मुनोत, शांतीलाल पटेल, बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष अशोकराव शेटे, सचिव तुकाराम सांळुके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बीड शहर व तालुका कार्यकारिणी व पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.
व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये शहर अध्यक्षपदी प्रकाशराव कानगावकर, कार्याध्यक्ष मंगेश लोळगे, महासचिव सूर्यकांत महाजन, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद ललवाणी, उपाध्यक्ष मुकेश अग्रवाल, कोषाध्यक्ष सुभाष उगले, प्रसिध्दी प्रमुख सुदाम चव्हाण, यांची निवड करण्यात आली.
तालुकाध्यक्षपदी राजेंद्र बन्सोडे, तर तालुका कायकरणीमध्ये महासचिव श्याम नंदलाल भंडारी, तालुका उपाध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, कोषाध्यक्ष विजय बाबुलाल तिवारी, सहसचिव कल्याण रायते, सहसचिव ज्ञानेश्वर बनसोडे, सभासद जयंत राऊत, शामराव पेंढरकर (राजुरी), सुग्रीव रसाळ (मांजरसुंबा) यांची निवड करण्यात आली.
व्यापारी महासंघाच्या बीड शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रकाशराव कानगांवकर यांनी सर्व व्यापारी बांधवांना सोबत घेवून काम करणार असून व्यापार्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण तन-मन-धनाने कार्य करुत असा विश्वास उपस्थितांना दिला. तर नुतन तालुकाध्यक्ष राजेंद्र बन्सोडे म्हणाले की, व्यापार्यांना सोबत घेवून आपण काम करणार असून तालुक्यातील व्यापार्यांना ज्या काही अडचणी भासत असतील त्या सोडविण्यासाठी कटीबध्द राहून काम करुत असे म्हणाले. तर नुतन पदाधिकार्यांनी देखील आपले विचार मांडले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पदाधिकार्यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढील प्रगतीच्या दिशेने वाटचाल, नवी दिशा, मार्गदर्शनपर भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुदाम चव्हाण यानी केले. यावेळी बालाप्रसाद जाजू, विश्वांबर थिगळे, सुशील खटोड, विजय तिवारी, प्रमोद नरे, दिलीप नरे, रामचंद्र जोशी, गंगाभिषण करवा, बद्रिनारायन मानधने, जवाहर काकंरीया, सी.ए. गोपाळ कासट, अभय कोटेचा, साईनाथ परभणे, लइक अहमद, सुरज लाहोटी, राणा चव्हाण, महेश शेटे, नागेश मिटकरी, अतुल मौजकर, अमोल शेटे, अक्षय शेटे, मदन दुग्गड, गणेश मंत्री, हरिष पडधरीया, कैलास वीर, प्रकाश कोटेचा, विकास झगडे यांच्यासह व्यापरी, उद्योजकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.