मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- महाराष्ट्र राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली पण गडचिरोली जिल्हात विकासाची गंगा पोहचू शकली नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला सावत्र जिल्हा बोलले तर अतिश्योक्ति होणार नाही? या जिल्ह्यातील एटापली तालुक्यात सुरजागड पहाळीवर दगड हा लोहा मिश्रित दगड असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा सावत्र पण तेथील खनिज संपत्ती ही महाराष्ट्र सरकारची झाली आहे. मात्र येथील जनता आजही सावत्रच आहे सरकार साठी एटापल्ली तालुक्यात सुरु असलेल्या त्रिवेणी मुव्हर्स कंपणी अंतर्गत लोहा मिश्रित दगड हे मोठया प्रमाणात असून त्या ठिकाणी जवळपास 200ते300वर्ष्यापर्यंत तो लोहा मिश्रित दगड काढले तरी संपणार नाही इतका मोठया प्रमाणात लोहखजिना साठा उपलब्ध आहे,ते बघून सरकार प्रशासन नियमाला धाब्यावर बसवून माल वाहतूक सुरू केली आहे. आलापली ते आष्टी राष्टीय महामार्गाचे अंतर 45 किलोमीटर असून या मार्गांवर दररोज सुरजागड लोह प्रकल्पाचे गाड्या जवळपास 700ते1000चा घरात या रस्त्याने कच्चा माल भरलेले व परत येताना रिकाम्या ट्रक, टिप्पर ची वाहतूक नित्यनेमाने होत असते यात तिळ मात्र शंका नाही, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अस या भागातील जनतेला वाटत आहे, याचा वाहतुक करताना ट्रक, टिप्पर ला एक पैश्याचा फरक पडत नाही पण लहान चारचाकी वाहने व दुचाकी वाहने चालवताना वाहन चालकास कुठुन वाहन चालवावे, रस्ता कुठे आहे व खड्डे कुठे आहे समजने कठीण झाले आहे.
एखाद्या बिमार व्यक्ती ला अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा येथील डाक्टराने पुढील उपचारासाठी गडचिरोली किंवा चंद्रपूर येथील दवाखान्यात रेफर केले तर रुग्णवाहिकेतच त्या रुग्णाचा जिव जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, रुग्णाला रस्त्यातच जिव गमावावे लागते ही परिस्थिती आज सुरजागड येथील त्रिवेणी मुव्हर्स कंपणीने निर्माण केली आहे व प्रशासनाचे सरकारचे पुरेपुर समर्थन आहे,यात काही दुमत नाही, यांचे कार्य गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना भागावे लागत आहे.
दरवर्षी या रस्त्यावर अपघात होत होते ते ही तुरळक पण कंपणीचे ट्रकाची वाहतुक सुरू झाली तर अपघातात जीव गमवावा लागत आहे त्यात कित्येकाचे जिव गमावावे लागले याला जवाबदार कोण, याची जवाबदारी कोण स्विकारणार सदोष मणुष्य वधाचा गुन्हा कुणावर दाखल करायचा हा प्रश्न चिंता निर्माण करत आहे. महत्वाचा म्हणजे देशाचा पोशिंदा माझा शेतकरी शेतात दिवसरात्र राब राब काम करून आपले व आपल्या परिवाराची खडगी भरण्याकरीता अहोरात्र परिश्रम करून पिक उभे करतो आहे,या पिकावर तो चिमणी पाखरा पासुन, जंगली जनावरां पासून वाचवून हाय धरत नाही तोच कंपणीचे कच्चा माल नेणाऱ्या ट्रका पासुन जो धुळ कण उडतात ते उभ्या पिकावर दव पडल्यासारखे पडत आहे, या धुळीने हाता तोंडाला आलेले उभे पिक अर्द्यातच सोडावे लागत आहे.यावर प्रशासन, सरकार धिम्म आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी दोन, चार गावकऱ्यांना घेवून दोन चार कार्यकर्ते सोबत ठेवून सोंग केले जाते पण सरकार व प्रशासन हातमिळवणी केले असल्याने ते सोंगेचे रूपांतर ढोंगीपणात झाले व लोकप्रतिनिधी चे आंदोलने, मोर्चा, संप हे शेतकऱ्यांचा हितासाठी केलेला नव्हता तर तो कंपणी वर दबाव टाळण्यासाठी केलेला होता हे सिद्ध होते.
गडचिरोली जिल्ह्याचे तीन आमदार, एक खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांनी बांधकाम इंजिनियर यांना घेवून एक मिटिंग करून व जुणा आलापल्ली ते आष्टी रस्ता हा किती टण झेपतो हि माहिती घेतली असती व चाळीस पन्नास टण साठी बनलेला रस्ता 80 टण माल वाहतुक होत आहे तर तो रस्ता रस्ता राहणार कि खड्डा होणार हे समजले असते, उत्खनन झालेला कच्चा माल हा कंपणीने रेल्वे रूळ बसवून उत्खनन केले असते तर आज हि परिस्थिती अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा वासींयाना दिसली नसती. मोदी सरकार म्हणत होते की अच्छे दिन आयेंगे शायद ये ही अच्छे दिन होंगे….
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348