प्रभु विश्वकर्मा जयंती,सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा इंदाराम येथे प्रतिपादन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इंदाराम:- आपल्या लोहार समाज हा आजही मागासलेला असून जिल्ह्यातील दुर्गम भागात वास्तव्यास आहेत. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येऊन लढा देण्याचे नितांत गरज आहे. समाजाने समाजाचे पूर्वीचे रूढी परंपरा, चाली रीती विसरले असून समाजांचे विकास साधण्या साठी पूर्वीचे चाली रीती, रूढी परंपरा व धर्म जपण्याचे आवश्यकता आहे असे इंदाराम येथे झालेल्या प्रभु विश्वकर्मा जयंती, सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळाव्यात उदघाटक स्थानावरून समाजाला प्रतिपादन केले. प्रभू विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून लोहार समाजाचा त्रितालुकीय लोहार समाज मेळावा, मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम इंदाराम येथे गाव शाखेच्या विशेष सहकार्याने आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनोद बावणे तर उदघाटक वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर चे अध्यक्ष प्राचार्य चरणदास बावणे, प्रमुख वक्ता म्हणून वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरचे सचिव सुरेश ए. मांडवगडे, युवाध्यक्ष जितेश मेश्राम, आदीलाबादचे जिल्हा अध्यक्ष सिताराम सुर्तीकार, कुमरम भिम जिल्हाध्यक्ष बापूराव बावणे, सिरपूर तालुकाध्यक्ष रामय्या औतकर, कुमरम भिमचे जिल्हा कोषाध्यक्ष संतोष गाताडे, तेलगनांचे आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्जुन सिडाम, प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी जि. प. सदस्य अजय नैताम, सरपंच वर्षा पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, माजी सरपंच गुलाब सोयाम, पोलीस पाटील सदाशिव दुर्गे, महासंघ कोषाध्यक्ष रामदास शेंडे, नागपूर, सल्लागार गोपाल शेंडे, महासंघ सल्लागार आनंदराव बावणे, अहेरीचे माजी अध्यक्ष एस.एस चंदनखेडे, अहेरीचे कार्याध्यक्ष अधिवक्ता यशवंत मेश्राम, गडचिरोली जिल्हाप्रमुख धर्मदास नैताम, महासंघ सल्लागार सुधाकर चंदनखेडे राजुरा, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दिनकर सोनटक्के, चामोर्शी तालुकाध्यक्ष किसन कोसरे, मूलचे अध्यक्ष गोविंद सोनटक्के, अहेरीचे जेष्ठ सल्लागार नामदेव बावणे, लक्ष्मीबाई बावणे, पेरमिलीचे अध्यक्ष रवी औतकर, अहेरी महिला अध्यक्ष शीतल कोसरे, पेरमिली महिला अध्यक्ष सविता चंदनखेडे, राजारामचे महिला अध्यक्ष रेणुका बामनकर, मूलचेरा अध्यक्ष बंडू बावणे, एटापल्ली अध्यक्ष साईनाथ चंदनखेडे, श्रीनिवास कोत्तावडलावार आदी उपस्थित होते.
माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार म्हणाले पुढे बोलताना लोहार समाज मुळात निसर्ग पूजक असून लोहार समाजाचे संस्कृती अदिवासी समाजाशी मिळते जुळते असून लोहार समाज कामरा म्हणून ओळखले जाते म्हणून लोहार समाज मुळातूनच आदिवासी जीवन पद्धतीने जीवन जगत आहेत त्यामुळे लोहार समाजाला अनु जमाती चे सवलती लागू होतील परंतु त्यासाठी मोठी लढाई शासनस्तरावर लढावे लागेल आणि लोहार समाजातील आडनावे नुसार देवे किती याची माहिती दिले आणि आरक्षण च्या संघर्षात संपूर्ण समाज सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी लोहार समाजाला मार्गदर्शन करीत समाजाच्या प्रत्येक समस्या किंवा कार्यक्रमाला मदत करून पाठिशी उभा राहील असे आस्वासन दिले. याप्रसंगी ऍड. यशवंत मेश्राम, दिनकर सोनटक्के, जितेश मेश्राम, सिताराम सुर्तीकर,बापूराव बावणे, अर्जुन सिडाम सह अनेक मान्यवर समाजाला मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील मान्यवरांचे अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, राजाराम, पेरमिली, इंदाराम शाखेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. व मागील २०२१ चे समाज सर्व्हेक्षण व मेळावा प्रचार प्रसिद्ध, निधी संकलन करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले..!!
या कार्यक्रमातचे सूत्रसंचालन राजारामचे अध्यक्ष रमेश बामनकर तर प्रास्ताविक ईश्वर मांडवकर आभार प्रदर्शन अध्यक्षीय मार्गदर्शन करून प्रा. विनोद बावणे यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वीते करीता अहेरीचे उपाध्यक्ष चिंतामण बावणे, इंदारामचे अध्यक्ष वसंत मेश्राम, कार्याध्यक्ष विनोद औतकर, राकेश मेश्राम, सर्व्हेशवर मांडवकर, मनोहर बावणे, मधुकर मेश्राम, नामदेव मांडवकर, साई चंदनखेडे, रमेश बामनकर, साईनाथ हजारे, अमर औतकर, भालचंद्र मेश्राम, सुरेश कोसरे, नागेश औतकर, कमलाकर हजारे, नितीन मेश्राम, बापूजी औतकर, शुभम औतकर, अक्षय औतकर, निलेश कोसरे, विश्वजित मेश्राम, विनोद कोसरे, मधुकर मेश्राम, महेश बावणे, अरुणा औतकर, माधुरी बावणे, जोत्सना औतकर, वैशाली कोसरे, कुसुम औतकर, अस्विनी हजारे, मनीषा औतकर, नागमनी कोसरे, पुष्पा कोसरे, अविका औतकर सह आदींनी केले आहे.