✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोलीस अधीक्षक साहेब यांचा गोपनीय बातमीदार असल्याचे सांगुन पोलीस स्टेशन रामनगर येथील फसवणुकीचा गुन्हा उघड केले बाबत दिनांक ३१ मार्च रोजी फिर्यादी पोलीस अधिकारी यांना मोबाईल क्र. ९६५३६८१४९० च्या धारकाने पोलीस अधीक्षक यांचा गोपनीय बातमीदार असल्याचे सांगुन पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत शहराच्या मधोमध मोठा जुगार सुरु असल्याबाबत खात्रीशीर माहिती आहे. तसेच जुगाराच्या ठिकाणी एक फटर ग्राहक पाठवायचा आहे. त्याला एक साधा मोबाईल घेवुन देणे काही रक्कम माझ्या खात्यावर टाका, असे फोनपे वरून बोलत सदर इसमास फिर्यादी यांनी त्यांचे आरोपीचे फोनपे क्र.वर ६८९२६९७९३२७ पैसे पाठविले. नंतर परत सदर इसमास संपर्क केला असता त्याने कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही व फोन बंद केलेला असताना यावरुन फिर्यादी यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक ०४ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. ३३३ / २०२३ फलम ४२० भादवि सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल मार्फत करण्यात आला. गुन्हयात आरोपीबाबत संपूर्ण माहिती हस्तगत करून आरोपी हा ठाणे शहर परीसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने वर्धा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हेशाखेचे एक पथक तात्काळ ठाणे येथे रवाना करण्यात आले. वर्धा पोलिस पथक ठाणे येथे पोहचुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी राहात असलेला परीसर इंदीरा नगर, ठाणे येथुन गोपनीय माहिती काढण्यात आली व आरोपी नामे योगेंद्रकुमार अतुल सोलंकी असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांन तर ठाणे परीसरातील वेगवेगळ्या परीसरात सतत चार दिवस सापळा रचला असता सदर आरोपी पोलीसांना हुलकावनी देवुन पसार होत असल्याने सदर पथकाने गोपनीय बातमीदार लावुन व आरोपीवर सतत पाळत ठेवुन आरोपीस ठाणे परीसरातील रंगोली साडी सेंटर, स्टेशन रोड या भागात सापळारचुन आरोपीस शिताफिने ताब्यात घेण्यात आले आरोपीस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन २मोबाईल व रोख ३२००/- रु असा एकूण २३,२००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीस विचारपुस केली असता सदरचा आरोपी हा संपुर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिकान्यांना फोन करुन जुगाराचा बाबत माहिती तसेच विदेशी व पिस्तुलची बामती देतो असे बतावणी करीत असतो आरोपीचे मोबाईलची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयाचे अधिकाऱ्यांची मोबाईल नंबरची यादी असल्याचे दिसुन आलेले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कदडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थागुशा याचे निर्देशाप्रमाणे पोहवा यशवंत गोल्हर नापाशि रामकिसन इप्पर सर्व स्थानिक गुन्हे शा.वर्धा व अनुप कावले, सायबर सेल वर्धा यांनी केली.