मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विद्यार्थी दशेत स्पर्धा परीक्षा हिच जीवनाची खरी परीक्षा असते त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनीनी स्पर्धा परिक्षेकड़े अधिक लक्ष घालून प्रत्येक सामान्य ज्ञान व स्पर्धा परीक्षेत हिरहिरिने भाग घ्यावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी केले. ते स्थानिक लक्ष्य अकैडमी पटवारी भवनात मंगळवार 11 एप्रिल रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बक्षीस वितरकच्या स्थानावरुण बोलत होते.
भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा रविवार 9 एप्रिल रोजी क्रांतिवीर वीरबाबूराव शेडमाके, म.ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे ओचित्य साधुन महात्मा फुले युवा संघर्ष समिती, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन, समता सैनिक दल शाखा, अहेरी यांच्या वतीने घेण्यात आले व विजेत्यांना आकर्षक रोख रक्कम ठेवण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सतीश पानगटीवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्य अकेडमी गृपचे संचालक विनोद दहागावकर, स्पर्धा परिक्षेचे आयोजक एडव्होकेट पंकज दहागावकर, वरुण उकरुदे, महेश मोहुर्ले, अश्विन मड़ावी, पल्लवी दहागावकर, शुभम नीलम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुरेंद्र अलोणे म्हणाले कि, शिक्षण हेच जीवनाची खरी दिशा व परिवर्तन घडवून आणण्याचे खरे साधन असून केवळ नोकरी मिळावे म्हणून नव्हे तर जीवनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण महत्वाचे असून शिक्षण घेणे अत्यावश्यक असल्याचे म्हणत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाकरिता संघर्ष केले असून या महामानवांची प्रेरणा घेऊन प्रत्येकांनी उत्तमोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत सहभाग घेणे गरजेचे व काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी सुरेंद्र अलोणे यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परिक्षेचे आयोजक एडव्होकेट पंकज दहागावकर यांनी तर सूत्रसंचालन सागर गाऊत्रे यांनी केले उपस्थितांचे आभार पल्लवी दहागावकर यांनी मानले. यावेळी स्पर्धा परिक्षेचे स्पर्धक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक-युवती बहुसंख्येने उपस्थित होते.
हे ठरले विजेते: सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत दोन वयोगट होते, 14 ते 18 वयोगटात प्रथम क्रमांक शिरीन आर. कुरेशी, द्वितीय अवंती अविनाश दुर्गे, तृतीय मोनाली पोच्या गेडाम यांनी पटकाविले. तर 19 ते 40 वयोगटात प्रथम दुर्गपालसाय ताराचंद सोयाम, द्वितीय महेश चालूरकर, तृतीय प्रवीण श्रीनिवास मोरला यांनी पटकावून भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे विजेते ठरले. मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.