देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका. जिल्हा नागपूर.
नागपूर:- नागपूर येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले व वर्तमान स्थानिक गुन्हेशाखेत मोटार परिवहन विभागात कर्तव्य बजावत असलेले पोलीस उपनिरीक्षक
साहेबराव बहाडे यांचा विद्युत करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सर्वाचे मन हेलावले आहे.
साहेबराव बहाडे आज सकाळी मोटार परिवहन विभागात सरकारी वाहन धुण्यासाठी घेऊन गेले असता येथेच त्यांना इलेक्ट्रिकचा जोरदार धक्का बसला त्यांना बाजूलाच असलेल्या एलेक्सीस रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांचे मोठे बंधू हे राज्य राखीव पोलीस दलात डि वाय एस पी या पदावर कार्यरत आहेत. बहाडे यांच्या अचानक निधनाने कामठी रोडवर असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.