राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- ऐन सणात रेशन धान्याचा काळाबाजार वाढला असल्याची चर्चा जिवती तालुक्यातील नागरिक करत आहे. कारण विदर्भात अनेक स्थिकाणी पोलिस आणि अन्न पुरवठा विभागाने शेकडो क्विंटल धान्य केले जप्त त्यामुळे रेशन धान्याचा काळाबाजाराचा प्रश्न परत समोर आला आहे.
शिधापत्रिकेवर कमी किमतीत दिला जाणारा तांदूळ गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यात आता जिवती तालुक्या मध्ये अन्न पुरवठा विभागात हलगर्जी कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना रेशनचे स्वस्त धान्यच मिळाले नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यांत विविध चर्चेला उधाण आले आहे. या रेशनचे स्वस्त धान्यात भष्ट्राचार करून ते धन्य काळाबाजार तर नाही नेण्यात आले हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिवती तालुक्यांतील अनेक गावात डिसेंबर महिन्यात पिएम गरीब केल्याण योजने अंतर्गत पर युनीट ५ किलो धान्य मिळणारे तालुक्यातील अनेक गावांत आज पर्यंत मिळालेले नसुन दुकानदारांकडुन व अन्नपुरवठा अधीकारी यांच्या कडे विचारपुस केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत सदर प्रकरणावर अन्नपुरवठा अधीकारी यांच्याशी चर्चा केली असता जणु आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती नसल्या प्रमाने मला माहीती नाही असे उत्तर देत असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.
डिसेंबर महीण्यातील पि एम गरीब कल्याण योजनेचे धान्य मार्च महीन्यात आले आहे आणी जानेवारी महीण्यापासून पि एम गरीब कल्याण योजना बंद झाली असुन नियमीत मिळणारे धान्य सरकार कडुन मोफत मिळत असल्याने नागरीकांना या मध्ये डिसेंबर महिन्यातील पि एम गरीब कल्याण योजनेचे धान्य प्राप्त झाले किंवा नाही याची भनक्क सुद्धा लागली नाही. त्यामुळे धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.