युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी ची दि.१६ ऑगस्ट रोजी दुपारी १:०० वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. शिवराज (बाबा)गुजर होते.
नागपूर जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव, आणि पुढे होऊ घातलेल्या निवडणुकी बघता ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे संकल्प घ्या अशा सूचना केल्या.
प्रमुख उपस्थिती ओ. बी. सी. विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वरजी बाळबुधे जानबाजी मस्के सेवादल प्रदेश अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस. अविनाशजी गोतमारे,प्रदेश चिटणीस, सतीशजी शिंदे, राजाभाऊ आखरे , मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. फ्रंटल सेल जिल्हाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी हिंगणा तालुकाध्यक्ष श्री. प्रविण खाडे व उमरेड विधानसभा अध्यक्ष श्री. विलास झोडापे यांच्या जागी नवीन नियुक्ती तात्पुरती स्थगितीदिली गेली कारण जिल्हा अध्यक्ष यांची नियुक्ती पत्रावर स्वाक्षरी नसलेने प्रवीण खाडे, विलास झोडापे हे कायम त्याच पदावर राहतील असे सूचना जिल्हा अध्यक्ष यांनी दिल्या
या प्रसंगी सेवादल प्रदेश अध्यक्ष. जानबाजी मस्के, प्रदेश सरचिटणीस गोतमारे, प्रदेश चिटणीस राजाभाऊ आखरे, सतीश शिंदे, पूर्व विदर्भ अध्यक्ष सेवादल योगेश धनुस्कर, वरिष्ठ उपाध्यक्ष सेवादल पुंडलिक राऊत, सभापती सौ. उज्ज्वला ताई बोढारे, युवक अध्यक्ष आशिष पुंड, विद्यार्थी अध्यक्ष आकाश गजबे, संस्कृतिक विभाग अध्यक्ष प्रभु अंभोरे, ग्रंथालय विभाग अध्यक्ष विशाल गाडबैल, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे, कामगार सेल अध्यक्ष सुधाकर तीबोले, सेवादल कार्याध्यक्ष गजानन महाकाळकर, वक्ता प्रशिक्षण सेल अध्यक्ष कैलास हुडमे, रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे, उमरेड विधानसभा अध्यक्ष विलास झोडापे, कामठी विधानसभा अध्यक्ष हरिदास मेश्राम,भागेश्वर फेंडर, हिंगणा तालुकाध्यक्ष प्रविण खाडे, मौदा तालुकाध्यक्ष आशिष पाटील, कामठी तालुकाध्यक्ष सोपान गभणे, रामटेक तालुकाध्यक्ष नकुल बरबटे, पारशिवनी तालुकाध्यक्ष सचिन आमले, काळमेश्वर तालुकाध्यक्ष भुजंग भोजनकर, कुही कार्याध्यक्ष लहू घुघुस्कर, भिवापूर तालुकाध्यक्ष नरहरी देवाळे, कामठी शहर अध्यक्ष शोएब असद, सावनेर शहरध्यक्ष सुरेंद्र वानखेडे, कलमेश्वर शहर अध्यक्ष बबनराव वानखेडे, मोहपा शहर अध्यक्ष रशिद शेख, रामटेक शहरध्यक्ष नितीन वेरूळकर, पारशिवनी शहर कार्याध्यक्ष पुरनदास तांडेकर, कुही शहर कार्याध्यक्ष गजानन लांजेवार, कन्हान शहरध्यक्ष अभिषेक बेलसरे, उषा शाहू, अल्का बघेल, मंदा झोडे जीवनलाल डोंगरे, अरविंद अंबागडे, व अनेक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारीय युवराज मेश्राम नागपूर जिल्हा सरचिटणीस व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.