डॅनियल अँथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पिंपरी,१४:- मुंबई पुणे महामार्गावर ट्रक मधून लोखंडी सळई चोरणारी टोळी पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून १९लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .पथकाने ही कारवाई तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली आहे. १) निजाम नवाब खान वय ५८ वर्ष, सध्या रा. पप्पू खळदे यांची खोली, हॉटेल रांगडा दरबारच्या मागे, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे मुळगाव रहिमानिया मस्जिद जवळ, कमलारमनगर, बैंगनवाडी, गवंडी, मुंबई २)शत्रुघन महाबल ठाकूर वय ६०वर्ष, रा. सुजा वेलची सोसायटी, सोमाटणे फाटा तळेगाव दाभाडे, पुणे मुळगाव पुरा बाजार तहसील सदर, जि.आयोध्या उत्तर प्रदेश ३)इजराइल अहमद आबेद अली शेख वय ३२वर्ष रा.सध्या पप्पू खळदे यांच्या खोलीत, हॉटेल रांगडा दरबारच्या मागे, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे मुळगाव बैराहपूर तहसील फतेहपुर उत्तर प्रदेश ४)मोहम्मद अरिफ खान वय४० वर्ष राहणार ॶह. रेहमान ट्रान्सपोर्ट शालीमार हॉटेल समोर, जलील कंपाउंड, धारावी मुंबई, मुळगाव कुरही,तहसील, जि.बांधा, उत्तर प्रदेश अशी ताब्यात घेतलेले सळई चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अमंलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार खाजगी वाहनाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत लिंबू फाटा तळेगाव दाभाडे येथे आले असता खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे गावच्या हद्दीत जुना मुंबई पुणे महामार्ग लगत असणाऱ्या हॉटेल रांगडा दरबारचया मागील मोकळ्या जागेत पथकाने सापळा लावून ०४ इसमाना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ०३लाख ७८ हजार ६०० रुपये किमतीचे ०६हजार ३१० किलो वजनाचे चोरी केलेले लोखंडी सळीचे बंडल व चोरीचा माल तसेच चोरीचा माल घेऊन जात असलेला १५ लाख किमतीचा टाटा ११०९ क्र एम एच ४३ वाय ७८२८ असा एकुण १८ लाख ७८ हजार ६००रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या टोळी विरुद्ध तळेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाची पोलीस हवालदार प्रदीप गुंडाबे हे करीत आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहायुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अमंलदार किरण काटकर, प्रदीप गोडांबे ,आशिष बोटके, प्रदीप गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.