मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील सेन्ट जॉन स्कूल मधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका विद्यार्थांच्या पालकांनी फी नभरल्यामुळे त्याला शाळेत काढून टाकले त्यामुळे त्या विद्यार्थ्याचे भविष्य बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे. आज खाजगी शिक्षण संस्थेचे मनमानी कारभार पुढे येत आहे. या अगोदर हिंगणघाट शहरातील रत्नाविघा निकेतन शाळेतून असच प्रकार समोर आला होता आता परत
एकीकडे संविधानाने देशातील प्रत्येक विद्यार्थांना शिक्षणाचा अधिकार दिला. शासन प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत असताना हिंगणघाट येथील सेन्ट जॉन स्कूल विद्यार्थांचा शिक्षणाच्या अधिकारावर फी नाही भरली म्हणून गदा आणत आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचे भविष्य अंधारमय होनार आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे पालक अतुलसिंग रामसिंग राठौड यांनी शिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा, वर्धा जिल्हाधिकारी, विभागीय उपसंचालक नागपूर, शिक्षणमंत्री शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युज ला विद्यार्थांचा पालकांनी दिलेल्या प्रेस रिलिज म्हणून सांगीतले की, माझा पाल्या नामे राजविरसिंग अतुलसिंग राठोड हा इयत्ता दुसरी मध्ये हिंगणघाट येथील सेन्ट जॉन कॉन्व्हेन्ट मध्ये सत्र २०२२ -२३ मध्ये शिकत होता. त्याची मागील वर्षाची फीज व इयत्ता पहिली काही उर्वरीत फी भरावयाची शिल्लक राहली होती. कारण मागील तिन वर्षापासून माझी कौटुंबिक परिस्थिती जेमतेम आहे कारण माझा मोठा भाऊ याचा अपघात झाल्यामुळे तो पूर्णपणे बेड पेशन्ट होता व त्याबाबतबशाळेला तसेच कळविलेले होते. माझा भाउचे १३ नोव्हे. २०२२ निधन झाले या दरम्यान कौटुंबिक परिस्थिती तसेच आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली म्हणून मुलांची फीज भरणे शक्य झाले नाही. यादरम्यान शाळेत पाल्यांना वारंवार फी करीता सुचना देण्यात आलेल्या होत्या, तसेच त्याला इयत्ता दुसरीच्या अंतिम परिक्षेमध्ये पहिल्या दिवशीच्या पेपरला सर्व मुलांमधून वेगळे नेवून सुरवातीचा काही वेळ बसवून ठेवले व त्यानंतर पेपर देण्यात आला. त्यामुळे त्याच्या बालमणावर होणारा परीणाम आपण समजू शकता.
यापूर्वी स्टेजवर माईकमध्ये ज्यांची फी उर्वरीत आहे त्यांचे नावे सर्व विद्यार्थ्यासमोर हा प्रकार घडलेला आहे. जे आपण शाळेच्या सीसीटीव्ही द्वारे तपासून बघू शकता. तुम्हाला गाडीमध्ये पेटोल भरावयास रुपये आहेत. ट्युशन फी साठी पैसे आहे पण शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाहीत असे स्टेजवर प्राचार्य यांच्याद्वारे म्हटले गेले. हे कितपत योग्य आहे हे सुध्दा आपण समजू शकता ज्यांचा परिणाम बाल्या अवस्थेत होणे म्हणजे त्यांच्या बालमणावर किती मोठा आघात आहे.
आतात वर्ग तिसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी ३० मार्च २०२३ पर्यत फीज भरा नाहीतर पुढील इयत्तेत प्रवेश मिळणार नाही. असे ताकीद देवून सांगण्यात आले. रक्कम ही चेक द्वारे भरणे बंधनकारक असल्यामुळे मी तसा बँकेत अर्ज केला त्यासाठी काही अवधी लागणार होता असे मला बैंक द्वारे सांगण्यात आले. त्याबाबत मी सिस्टर प्रिती, प्राचार्य यांना कळविले. परंतु त्यांनी इयत्ता तिसरीचे सत्र सुरू होवून सुध्दा त्यांनी माझ्या पाल्याला इयत्ता दुसरी मध्येच बसविले हा प्रकार सतत तिन दिवस चालला. मी याबाबत प्राचार्य यांना विचारणा केली असता जोपर्यंत तुम्ही मुलाची फीज भरणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाल्याला दुसरीमध्ये बसवू अन्यथा आपण त्याला घरी घेवून जावे व त्याला पाठवे सुध्दा नका असे सांगण्यात आले. मी त्यांना माझ्याकडे कॅश रक्कम आहे पण चेकबुक येण्यास वेळ आहे हे सुध्दा सांगीतले आहे. हा सर्व प्रकार घडत असताना माझा पाल्य तिथेच उपस्थित होता व प्राचार्यानी त्यांला सांगितले पण ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तसा व्हिडीओ पुरावा सुध्दा माझ्याजवळ आहे. इयत्ता दुसरीमध्येच असे सांगून ताकीद दिली ते सुध्दा माझे समोर.
शिक्षणाधिकारी साहेब या प्रकारे पाल्यासमोर बोलल्यामुळे त्याच्या बालमणावर होणारा परिणाम आपण समजू शकता कुठल्या नियमात आहे. शाळेच्या फी बाबत मुलांना विचारणा करणे हे सेन्ट जॉन कॉन्व्हेन्ट हिंगणघाट हे सीबीएसई शी सलग्न आहे म्हणजेच सीबीएसई चे सर्वच नियम व अभ्यासक्रम यांना लागू आहेत. मग इयत्ता तिसरीसाठी अभ्यासक्रम नुसार चार ते पाच पुस्तके असायला हवी व त्यांची किंमत रूपये २०० ते ३०० दरम्यान असायला हवी. मग ही संस्था इयत्ता तिसरी साठी जवळपास १५ पुस्तके रुपये ४६२५/- आकारत आहे हे सुध्दा कोणत्या नियमात बसत आहेत ते सुध्दा आपण सांगावे, व प्रत्येक वर्षी नवीन पुस्तकांचा तकादा का बरं असता, तसेच शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक अर्हता ही सीबीएसई नियमानुसार आहे की नाही याची आपण चौकशी करावी ही विनंती.
स्कूल डायरी ओळखपत्र यासाठी वेगळी रूपये १०००/- ची मागणी प्रत्येक विद्यार्थ्यांन कडून का बर केली जाते व त्याचा हिशोब कुठेच नसतो प्रत्येक वर्षी हा प्रकार चालतो याबाबत आपण चौकशी करावी ही विनंती. वरील सर्व नमूद मुद्द्यांवर शाळेची चौकशी व्हावी व फीज साठी विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास याबाबत आपण जातीने दखल घेवून न्याय द्यावा. सत्र सुरुवातीपासून माझ्या मुलाचे शैक्षणिक नुकसान याबाबत आपण जातीने दखल घेवून न्याय दयावा ही कळकळीची विनंती. अतुलसिंग रा. राठोड यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348