✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 14 एप्रिल रोज शुक्रवारला त्रिशरण नगर संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट जि. वर्धा येथे महामानव क्रांतीसुर्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संकल्प बौध्द पंच कमेटीचे अध्यक्ष विनोद दारूंडे व डाॅ. रुईकर साहेब (पंचायत समिती हिंगणघाट) यांचे हस्ते करण्यात आले. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंचे पुजन व माल्यार्पण अरूणभाऊ झाडोदे व तथागत गौतम बुद्ध यांच्या फोटोंचे पुजन व माल्यार्पण पाडुरंगजी भारशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डाॅ. रुईकर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याबदल माहिती सांगितली तसे विनोद दारूंडे, राजु मून सर, जगदीश कांबळे सर, प्रा.नरेंद्र मेश्राम, लक्ष्मणराव कांबळे, सौ.प्रिती सुरेंद पाटील, सौ.रेखाताई ऋषीजी सुटे, यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याबदल माहिती सांगितली व महिलांनी भिमगिते गायन केले.
यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाला त्रिशरण नगरातील उपासक व उपासिका याच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाई उत्सव समितीच्या अध्यक्ष सौ.शितलताई शंभरकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार रमाई उत्सव समितीच्या उपाध्याक्षा सौ.मनिषा प्रमोद नगराळे यांनी केले. या कार्यक्रमाकरीता रमाई उत्सव समिती च्या सर्व महिलांनी परीश्रम घेतले. अश्याप्रकारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.