पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
रावेत पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १४/०४/२०२३ रोजी पोशि/ २०५३ कचरे, पोशि/ २७२१ नविन चव्हाण, पोशि/ सतिश शिंदे असे रागस्ती करीता रावेत पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय येथे रात्रगस्त करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मुंबई ते पुणे जाणारे हायवे रोडलगत असलेले तोरणा हॉटेल पुनावळे येथे एका पत्र्याचे शेड मध्ये काही इसम स्वतःची काळजी न घेता धोकादायक पद्धतीने व्यवसायिक गॅस टाकीमधुन काढून दुस-या गॅस टाकीमध्ये रिफिलींग करीत आहे अशी बातमी मिळालेने सदर बाबत लागलीच रागस्त अधिकारी सपोनि पी आर शिकलगार सोो. यांना सांगीतले नंतर सहा. पोलीस निरीक्षक शिकलगार साहेब यांनी सदर बातमीचा आशय वपोनि शिवाजी गवारे यांना सांगितले असता, सपोनि पी आर शिकलगार, पोशि/ २०५३ कचरे, पोशि/ २७२१ नविन चव्हाण, पोशि/ सतिश शिंदे यांनी सापळा लावून इसम नामे १) किशोरकुमार भाकरराम मेघवाल वय २२ वर्ष धंदा गॅस विक्री रा तोरणा हॉटेल मागे मुंबई पुणे हायवे पुनावळे ता हवेली जि पुणे मुळ मुलाणेरा तहसिल सोजत जि पाली राज्य राजस्थान २) रितेश सुरेश यादव वय २१ वर्ष चंदा गॅस चिकी रा तोरणा हॉटेल मागे मुंबई पुणे हायवे पुनावळे ता हवेली जि पुणे मुळ छूटकी बेलहारी तहसिल बांज डिंग, जि. बलिया, राज्य उत्तरप्रदेश ३) राजाराम लालाराम बिष्णोई वय ३८ वर्षे धंदा गॅसविक्री रा तोरणा हॉटेल मागे मुंबई पुणे हायवे पुनावळे ता हवेली नि पुर्णे मुळ -जभेश्वर नगर शिवपुरीता लोहावट जि जोधपुर राज्य राजस्थान यांना ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता सदर गॅस गोडाऊनचा मालक चौधरी असे सांगितले. सदर ठिकाणी १) ३२६५६/- रुपये किमतीचे १६ भरलेले व ६८,०००/- रुपये किमतीचे ४० रिकामे गॅस सिलेंडर २) ५,००,०००/- रुपये किमतीचा महींद्रा पिकअप ३) ८,०००/- रु कि.चे रिफीलींग करण्याचे साहित्य व वजन काटे असा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी व मिळून आलेला मुद्देमाल रावेत पोलीस ठाणेस आणून गुरन १७६/२०२३ भा.द.वि.सं.कलम ४२०, २५८,३४ सह जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३३७ सह एल पी जी ( पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पिपरी-चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सो. मा. सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहीया सो., मा. अपर पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे सगो, श्री काकासाहेब डोळे गो. पोलीस उप आयुक्त परी २, सहा पोलीस आयुक्त पदमाकर घनवट सो, देहुरोड विभाग देहुरोड व शिवाजी गवारे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रावेत पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शिकलगार सहा पोलीस free, पो. गवारी, मपोहवा / १३८० मेहता, पोना / १४८२ गुजर, पोशि/ २०५३ कचरे, पोशि/ २७२१ नविन चव्हाण, पोशि/ १३०९ रणदिवे, पोशि/२१६० तांबे व पोशि सतिश शिंदे यांनी केली आहे.