✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 15 एप्रिल रोज शनिवारला त्रिशरण नगर संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट जि. वर्धा येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर याच्या 132 व्या जयंतीनिमित्त परीसंवाद व स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या परीसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद दारूंडे संकल्प बौध्द पंच कमेटीचे अध्यक्ष, मार्गदर्शक प्रा. डाॅ अशोक कांबळे, प्रमुख अतिथी ॲड. ऋषीजी सुटे यांनी कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंरत सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी विनोद दारूंडे यांचे स्वागत रमाई उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. शितलताई शंभरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर मार्गदर्शक प्रा. डाॅ. अशोक कांबळे यांचे स्वागत सौ. वैशालीताई नरेंद्र मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले, प्रमुख अतिथी ॲड. ऋषीजी सुटे यांचे स्वागत रमाई उत्सव समितीच्या कोषाध्यक्षा सौ. चंदाताई अरूण झाडोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नरेंद्र मेश्राम सर यांनी केले त्याचप्रमाणे त्रिशरण नगर हिंगणघाट येथील कुमारी अनुजा उमेश नवनागे या मुलीची पोलिस चालक या पदावर नियुक्ती झाल्यामुळे तिचा सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व भारताचे संविधान देवुन मांन्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या मनोगतात कुमारी अनुजा उमेश नवनागे यांनी या पदावर नियुक्ती कशी झाली यासाठी तिने काय- काय परीश्रम घेतले हे तिने त्रिशरण नगरातील सर्व विद्यार्थी व उपासक व उपासिका यांना आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्रीमंती शालिनीताई शुध्दोधन लाऊत्रे आरोग्य सेविका या पदावरून सेवानिवृत्त झाल्या मुळे मांन्यवराच्या हस्ते साडी देवुन सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला त्यानंतर डाॅ. प्रा. अशोक कांबळे यांनी डाॅ .बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्याबदल मोलाचे मार्गदर्शन केले. मुरलीधर भगत सर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर गितगायन केले. ॲड. ऋषीजी सुटे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याबदल मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद दारूंडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजुभाऊ मुन सर यांनी केले तर आभार जगदीश कांबळे सर यांनी केले. 14 एप्रिल व 15 एप्रिल 2023 या दोनदिवसासाठी संकल्प बौध्द पंच कमेटी सर्व सदस्य गण तथा उपासक आणि रमाई उत्सव समितीच्या सर्व सदस्या व उपासिका यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. तसेच प्रा.नरेंद्र मेश्राम सर यांनी 1 मे 2023 पासून बाल संस्कार वर्ग सुरू करण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला. अश्याप्रकारे त्रिशरण नगर हिंगणघाट येथे दोन दिवस डाॅ .बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम घेण्यात आला.